……” फलाट क्रमांक १ ला जोडणारा मध्यभागी रेल्वे ब्रीज बनविण्याची कर्जतकर प्रवाशांची मागणी “……
ज्येष्ठ " नागरिक व महिलांना " होतोय अतोनात त्रास , रेल्वे प्रशासनावर अनेकांचा संताप !

रेल्वे गाडीने ” फलाट ” बदलला की कर्जतकर प्रवाशांच्या ” हृदयाचा ” चुकतोय ठोका…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
रेल्वे प्रवाशांनी इकडे लक्ष द्या , ” फलाट क्रमांक २ वर येणारी खोपोली गाडी आता फलाट क्रमांक १ वर येत आहे ” , अशी सूचनेचा आवाज कर्जत रेल्वे प्रवाश्यांना रेल्वे स्थानकावर ऐकायला आल्यावर ज्येष्ठ नागरिक , महिला वर्गाचा ” हृदयाचा ” ठोकाच चुकतो . १ की. मी. लांबीचा फलाट पार करून रेल्वे ब्रीज पार करून रेल्वे गाडी पकडायची म्हणजे प्रवाश्यांना अतोनात त्रास होतो . म्हणूनच फलाट क्रमांक १ ला मध्यभागी जोडणारा रेल्वे ब्रीज तयार करण्याची संतापजनक मागणी आता रेल्वे प्रवाशांत जोर धरू लागली आहे .

याबाबतीत या अगोदर हि अनेक वेळा या गंभीर समस्येची मागणी भरपूर वेळा रेल्वे प्रवाशांनी केली होती . मात्र या समस्येकडे रेल्वे प्रशासन गांभीर्याने या मागणीकडे लक्ष देत नाहीत . रेल्वे मंत्री ” अश्विन वैष्णव ” हे अनेक वेळा कर्जत स्टेशनला भेट द्यायला आले , यावेळी देखील त्यांना हि समस्या सांगितलेली असताना या रेल्वे मंत्र्यांना हि गंभीर समस्या दिसत नाही , हि शोकांतिका आहे .

अशी रेल्वे लोकल गाडी , मेल फलाट बदलण्याची परिस्थिती अनेक वेळा कर्जत रेल्वे स्टेशनवर होत असते . यावेळी आपले कुटुंब , ज्येष्ठ नागरिक , लहान बच्चे कंपनी , आपलेसामान घेऊन फलाट बदलण्याची जीवघेणी परिस्थिती रेल्वे प्रवाशांवर येते . रेल्वे गाड्या थांबत नाहीत , रेल्वे गाड्या रद्द , योग्य तिकीट मिळत नाहीत , अश्या अगोदरच अनेक समस्या कर्जत रेल्वे स्थानकावर असताना आता या गंभीर समस्येने प्रवासी ” व्याकुळ ” झाले आहेत . ” सुस्त ” रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नाहीत , तर रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थापन केलेल्या ” कर्जत रेल्वे प्रवासी संघटना ” देखील या समस्येपासून ” अनभिज्ञ ” दिसत आहे . मग आम्हाला ” न्याय ” कोण देणार ? कोण हि ” समस्या ” सोडविणार ? असा यक्ष प्रश्न रेल्वे प्रवाश्यांसमोर उभा राहिला आहे . यामुळे रेल्वे प्रवाशांत दिवसेंदिवस ” संतापाची ” लाट पसरत आहे.




