……” कर्जत तहसील कार्यालयाच्या गलथान कारभाराविरोधात रमेश दादा कदम यांचे संतप्त क्रोध उपोषण “…..
" शालेय विद्यार्थी व इतर नागरिकांना " दाखले मिळत नसल्याने कर्जतमध्ये " संतापाची " लाट !

” बेजबाबदार ” कर्जत ” तहसीलदार धनंजय जाधव ” यांनी लक्ष देण्याची मागणी……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात बेजबाबदार शासकीय अधिकाऱ्यांचे ” कान ” उपटल्याशिवाय त्यांना जाग येत नाही , झोपेचे सोंग घेऊन आपल्या ” कर्तव्यात कसूर ” करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई ” जिल्हाधिकारी किशन जावळे ” करत नसल्याने कर्जत तालुक्यात शासकीय कामात ” मरगळपना ” आलेला आहे , म्हणूनच गेली वर्षभर पोलीस मित्र संघटनेचे व इतर संघटना , राजकीय पक्षांनी अनेक आमरण उपोषण केलेले असताना जिल्हाधिकारी मात्र या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करून तालुक्यात येऊन कुणाचीच ” कान उघडणी ” करताना दिसत नाहीत , आणि यामुळेच कर्जत तालुक्यात जिल्हाधिकारी किशन जावळे , कर्जत प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ , व कर्जत तहसीलदार धनंजय जाधव या प्रमुख अधिकाऱ्यांच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे .
राज्याबरोबरच कर्जत तालुक्यातील १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच लागला आहे , ९ मे २०२६ रोजी १० वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल लागून आज १५ दिवस व्हायला आले आहेत . आपले भविष्य घडविण्याच्या दिशेने ” गरुड झेप ” घेणाऱ्या देशाच्या भावी पिढी असलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत शासकीय दाखले न मिळाल्यास पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळणार नसल्याने विद्यार्थ्यांचे ” पंख ” छाटण्याचे काम सध्या कर्जत तहसील कार्यालयातील तहसीलदार धनंजय जाधव करत असल्याचे चित्र दिसत आहे . या बेजबाबदार तहसीलदार धनंजय जाधव यांच्या कार्यालयातील शासकीय दाखले देणारी ऑन लाइन नेटवर्किंग साईट चालत नसल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना वेळेत सर्व प्रकारचे दाखले मिळत नाहीत . कर्जत तालुका आदिवासी बहुल भाग असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्यास जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल यानिमित्ताने रमेश दादा कदम यांनी उपस्थित केला आहे .

या गंभीर समस्यांकडे शासनाचे व प्रशासनाचे तसेच बेजबाबदार तहसीलदार धनंजय जाधव यांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच सर्व मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी पुन्हा एकदा ३७ वे पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी गुरुवार दि. २२ मे २०२६ रोजी कर्जत तहसीलदार कार्यालय नवीन प्रशासकीय भवन समोर , कार्यालयीन कामकाज वेळेत संतप्त बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे .
यावेळी या दरम्यान पोलीस मित्र संघटनेने खालील मागण्या केल्या आहेत .
१ ) कर्जत तालुक्यातील हजारो विद्यार्थी व अनेक नागरीकांना ऑन लाइन साईट चालत नसल्यामुळे सर्व प्रकारचे दाखले वेळेत मिळत नाहीत , त्यामुळे शासनाने व प्रशासनाने सर्व प्रकारचे दाखले ऑफलाईन देण्याची व्यवस्था करावी .
२ ) ऑन लाइन साईट चालत नसल्यामुळे वेळेत दाखले मिळत नाही त्यामुळे उत्पन्न दाखला दाखल केल्याच्या पावतीवर विद्यार्थ्यांना सर्व विद्यालयाने प्रवेश देऊन उत्पन्नाचे दाखले दाखल करण्यास २ महिण्याचा कालावधी देण्यात यावा .
शासन व प्रशासनाने बेमुदत साखळी उपोषणाची दखल घेऊन मागण्या पूर्ण न केल्यास कोणत्याही क्षणी ” बेमुदत आमरण उपोषण ” सुरु करण्यात येईल व जो पर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरू राहील . तरी त्वरित या गंभीर बाबीची दखल घेऊन कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांनी त्वरित ” ॲक्शन मोड ” घेऊन विद्यार्थ्यांचे भविष्य जपावे , अशी संतप्त मागणी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी केली आहे .




