दिल्ली NCR

…….” शिवसेनेचे कट्टर समर्थक , महत्वाकांक्षी नेता रायगड जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर “……

शिवसेना रुजवून , आमदार " महेंद्र शेठ थोरवे " यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा !

” शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख ” एक संघर्षमय प्रवास ….. 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत – खालापूर मतदार संघात शिवसेनेचे ” डॅशिंग ” नेते म्हणून ओळख असलेले ” जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर ” हे महत्वाकांक्षी नेतृत्व म्हणून ओळखले जातात . ” शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख ” हा त्यांचा शिवसेनेतील प्रवास खूपच ” कट्टरवादी ” असून ” शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ” यांचे प्रगल्भ विचार व शिवसेना पक्ष या कर्जत खालापूर मतदार संघात वाढविण्यासाठी त्यांची प्रमुख भूमिका या ३५ वर्षाच्या कालखंडात सर्वाँना परिचित आहे . ” वासऱ्याचां खोंडा ” म्हटला की प्रथम ” डॅशिंग नेतृत्व ” म्हणून संतोष शेठ भोईर यांचे नाव घेतले जाते . गेली २० वर्षे त्यांनी तमनाथ ग्रामपंचायतीचे नेतृत्व करत सरपंच पद भूषविले असून त्या माध्यमातून परिसरात विकास साधला असल्याने त्यांच्या कार्याला तोड नाही . गोर – गरीब – गरजू नागरिकांना नेहमीच मदतीचा हात देवून त्यांनी त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत , तर तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे . महिलांना स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांचे हात मजबूत केले आहेत .स्वतः उद्योजक असल्याने अनेक आदिवासी व इतर समाजातील बांधवांना आपल्या विट भट्टी , दगड खाणी , शेती व्यवसाय , भाजी पाला व्यवसायात रोजगार उपलब्ध करून दिला आहे . कला क्रीडा क्षेत्रात देखील त्यांनी मराठी मैदानी खेळाला प्राधान्य उपलब्ध करून त्यांना चमकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने या मतदार संघात त्यांचे नाव सर्व क्षेत्रात आदराने घेतले जाते .

           महाराष्ट्रात धगधगते विचारांचे अग्निकुंड , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेले ते ” शाखाप्रमुख ” असल्याने कुठलाही निर्णय ते तडफेने घेतात . कर्जत मध्ये शिवसेना नावाचे घोंघवणारे वारे आल्यावर त्यांनी त्यात उडी घेतली , सन १९९० च्या दशकात ऐन उमेदीच्या काळात ते शाखाप्रमुख झाले . यावेळी तमनाथ व वासऱ्या च्या खोंड्यात त्यांनी शिवसेनेची बीजे चांगलीच रुजवली . या मतदार संघात देवेंद्र साटम यांनी ३ वेळा आमदार होवून नेतृत्व केले , त्यात त्यांचा खूप मोठा ” सिंहाचा वाटा ” आहे . 

           तमनाथ – शिरसे ग्रामपंचायतीवर त्यांची सत्ता गेली ३५ वर्षे व आजही असून त्यांनी २० वर्षे या ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषविले आहे . त्यांनी आपल्या कार्याच्या जोरावरच या मतदार संघात आमदारकी देखील लढविली , मात्र फार थोड्या मताने त्यांची आमदारकी हुकली , मात्र ते निराश न होता , आजही जनतेची सेवा निस्वार्थ भावनेने करत आहेत . कोंढाणा धरण असो , रस्ते , वीज , पाणी , शिक्षण , आरोग्य , पर्यटन , या सर्व समस्या सोडविण्यात ते अग्रेसर असतात.

          महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री ” एकनाथजी शिंदे साहेब ” यांच्या नेतृत्वाखाली व येथील कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सर्व प्रथम त्यांना साथ देत या मतदार संघात शिवसेना जिवंत ठेवली . आज ते शिवसेनेचे ” रायगड जिल्हाप्रमुख ” असून खासदारकी व आमदारकीच्या ” अटीतटीची व चुरशीची ” झालेल्या निवडणुकीत त्यांनी खूप मोठी कामगिरी करून ” शिवसेनेचा भगवा डौलाने ” फडकविला आहे . आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे ते जीवा भावाचे कट्टर समर्थक असून त्यांचा शिवसेनेत ” दबदबा ” आहे . योग्य संघटन कौशल्य , राजकीय डावपेच , साम दाम दंड भेद अश्या सोंगट्या टाकत राजकीय पटलावर आजही त्यांची महंती अबाधित आहे . येणाऱ्या काळात ” सिडको अध्यक्ष ” किंवा महामंडळावर नियुक्ती होण्याची संधी त्यांना मिळू शकते , असे त्यांचे नेतृत्व असल्याने त्यांच्या अनुभवाचा व कार्य कौशल्याचा फायदा सर्वांना व्हावा , अशीच आकांक्षा त्यांच्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना त्यांचा चाहता वर्ग , त्यांचे शिवसैनिक , मित्र परिवार करत असून त्यांचे स्वप्न नक्कीच साकार होईल , असे चित्र सध्या येथे पहाण्यास मिळत आहे . त्यांना वाढदिवसानिमित्त ” जनतेच सरकार ” परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!