…..” आरोग्य तुमच्या दारी , नगरसेवक ॲड रोहित ओसवाल यांचा स्तुत्य उपक्रम ” …..
शिवसेनेचे नगरसेवक " ॲड. रोहित ओसवाल " यांच्या नेतृत्वाखाली " आरोग्य तपासणी व देशव्यापी रक्तदान शिबिर " कार्याचे कर्जतमध्ये आयोजन !

नगरसेवक ” ॲड. रोहित ओसवाल ” यांच्या पुढाकाराने कर्जत मेडिकल असोसिएशन , रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर , स्वराज्य फाऊंडेशन व ICTC कॅन्सर सेंटर (वाशी) यांचे सहकार्य……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषदेत इतर नगरसेवकांना जमले नाही ती महत्त्वपूर्ण समाजसेवा व विकास कार्य ” शिवसेनेचे नगरसेवक ॲड रोहित राजेंद्र ओसवाल ” हे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे व युवा नेते नगरसेवक ॲड संकेत भासे ” यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत नगरीत करीत आहेत . विकास कार्य – समाजसेवा – सामाजिक कार्य – व आता आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर घेऊन देशहिताचे ” अष्टपैलू काम ” शिवसेनेचे नगरसेवक ॲड रोहित ओसवाल करत आहेत . यामुळे त्यांचे सर्व स्तरातून ” कौतुक ” होत असताना दिसत आहे .
बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत शनी मंदिर, महावीर पेठ, कर्जत – रायगड येथे शिवसेनेचे नगरसेवक ” ॲड रोहित ओसवाल ” यांच्या पुढाकाराने व कर्जत मेडिकल असोसिएशन , रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर , स्वराज्य फाऊंडेशन व ICTC कॅन्सर सेंटर (वाशी) यांचे सहकार्याने कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. ” महेंद्र शेठ थोरवे ” व कर्जत नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते ॲड. मा. श्री. ” संकेत दादा भासे ” यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य तपासणी व देशव्यापी कार्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .

या भव्य शिबिरात कर्जत नगरीतील नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता म्हणून महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणी / मॅमोग्राफी शिबिर (४० वर्षांवरील) , ब्रेस्ट कॅन्सर थर्मल स्क्रीनिंग , शुगर तपासणी , रक्तदाब तपासणी , हृदयाची ECG तपासणी , स्त्रीरोग चिकित्सा , अस्थिरोग चिकित्सा , आवश्यक औषधे वाटप , व देशव्यापी कार्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
या आरोग्य शिबिरात तपासणी करण्यासाठी डॉ. कुमार ओसवाल – 9822749491 , डॉ. प्रशांत गांगल – 7021875251 , पंकज शिंदे – 9850977632 , आशिष वर्मा – 7875359997 , विनायक -74149 12321 , कुणाल गुप्ता- 82756 40455 , रोहित बाफना- 78757 97797 यांच्याकडे तपासणीसाठी येणाऱ्यांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.

तरी आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवाराला ही माहिती जरूर पाठवा, व महिला वर्ग , ज्येष्ठ नागरिक , नागरिक यांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्या , तसेच देशव्यापी रक्तदान शिबिरात सहभाग घ्या , असे आवाहन व विनंती शिवसेनेचे नगरसेवक ” ॲड . रोहित राजेंद्र ओसवाल ” यांनी केले आहे .



