…..” शिल्परत्न ” पांडुरंग अर्जुन उर्फ जीवन घोडके ” यांची ७४ वी जयंती मोठे वेणगाव – कर्जत येथे उत्साहात साजरी “……
" शिल्पकार साहित्य कला मंडळांने " व अनेक मान्यवरांनी दिल्या आठवणींना उजाळा !

” प्रेरणा भालेराव व मंडळाचे अध्यक्ष नरेश जाधव ” यांचा पुढाकार……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” झोपडीत माझ्या वाकूनी आत आले , मनात खोटे राखुनी आत आले……मी कुणाला का ठरवू दोषी, तयांना ओळखाया मीच ठरलो अपयेशी…..कारण स्वार्थी – कपटी – लोभी नगरीचे , होते ते रहिवाशी ….होते ते रहिवाशी……” असे एक ना अनेक अजरामर काव्य लिहून समाजात जनजागृती करणारे कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील ” शिल्परत्न ” व शिल्पकार साहित्य कला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रबोधनकार – कलारत्न – साहित्तिक – शिघ्रकवी – सांस्कृतिक – धार्मिक – शैक्षणिक – सामाजिक व राजकीय क्षेत्रातील चमकणारा तारा , ” गुरुवर्य पांडुरंग अर्जुन उर्फ जीवन घोडके ” यांचा १ ऑक्टोंबर २०२६ रोजी ” जन्मोत्सव ” मोठे वेणगाव – कर्जत येथे मोठ्या उत्साहात घोडके परिवार व शिल्पकार साहित्य कला मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांची मुलगी प्रेरणा सचिन भालेराव यांच्या पुढाकाराने साजरी करण्यात आली.
प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध – भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व शिल्परत्न पी. ए. घोडके यांच्या प्रतिमेस सुमन पांडुरंग घोडके यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले . यावेळी अनेकांनी त्यांच्या स्मृतिस उजाळा दिला . पत्रकार जगन्नाथ दादा ओव्हाळ यांनी पी. ए. घोडके यांचे कलावंतासाठी व सामाजिक कार्य कसे होते , हे सांगितले . तर सुभाष दादा गवळे यांनी घोडके दादा हे आमचे व आमच्या गावाचे प्रेरणास्थान होते , हे सांगून त्यांचे कार्य कलावंतांनी पुढे नेणे गरजेचे आहे , असे आवाहन केले.
१ ऑक्टोंबर १९५२ रोजी पांडुरंग घोडके यांचा जन्म वेणगाव येथे झाला , खूपच हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेवून त्यांच्या वडिलांचे छत्र गेल्यावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कुटुंब सांभाळले , व त्यातूनच महापुरुषांचे चरित्र वाचून सर्वगुण संपन्न होवून कला क्षेत्रा बरोबरच राजकीय – शैक्षणिक – सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले . त्यांचे काव्य आजही अजरामर आहे , त्यांनी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विठ्ठलजी उमप , प्रल्हादजी शिंदे यांच्या बरोबर गायन केले होते , रायगड बरोबरच कर्जत , खोपोली येथे त्यांनी दलीत पँथर , आर पी आय , कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वाखाली त्यांची आंदोलने , मोर्चे गाजली . कॉम. नाना ओव्हाळ , ऍड. गोपाळ शेळके , माधव मोकाशी यांच्यासोबत त्यांनी काम केले . ” गुरुवर्य पी.ए.घोडके ते जीवन घोडके ” हा त्यांचा प्रवास खूप संघर्षमय होता , त्यांनी कलावंतांना एकत्रित रहाण्यासाठी ” शिल्पकार साहित्य कला मंडळाची ” स्थापना केली , हे मंडळ त्यांचे ” जीव की प्राण ” होते .

यावेळी विचार पिठावर बौद्धचार्य किसन रोकडे , राजिप मा. समाज कल्याण सभापती सुभाष दादा गवळे , शिल्पकार साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष नरेश जाधव , पत्रकार जगन्नाथ दादा ओव्हाळ , वेणगाव ग्रामस्थ अध्यक्ष वसंत मोरेश्वर जाधव , रविंद्र सोनावणे – मा. अध्यक्ष विभाग क्रमांक ८ , उपस्थित होते. तर या कार्यक्रमास उत्तम दादा सोनावणे – वेणगाव मा. सरपंच , वेणगाव ग्रामपंचायत सदस्या सौ. रातांबे , गणेश जाधव – कर्जत ता. सचिव , शिवसेना उप शाखा प्रमुख उत्तम दादा जाधव , विनोद भाई भालेराव – युवा नेता , सुशांत जोशी , रिटायर्ड पी एस आय भालेराव साहेब , भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष बी एस गायकवाड , संजय जाधव , गुलाब शिंदे , गायकवाड , सुमित भालेराव , सुदाम गवळे , आनंद सोनावणे – समाजसेवक , प्रकाश सोनावणे , गौतम सोनावणे , मिलिंद गवळे , अनिल गवळे , बाळाराम गवळे , प्रल्हाद रातांबे , अमोल ढोले , त्याचप्रमाणे अनेक कलावंत , कलाप्रेमी , ग्रामस्थ , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर त्यांची मुले प्रेरणा भालेराव , अभिनय घोडके , अश्विनी कांबळे , प्रगती माने , प्रणित घोडके , सून विद्या घोडके , जागृती घोडके , जावई सचिन भालेराव , तसेच नातवंडे – प्रद्युम्न , सुधांशू , शास्वत , प्रांजली , शास्वती , राज , गार्गी , हर्षु , यश , आर्यया त्याचप्रमाणे पत्रकार , अनेक नागरिक , महिला वर्ग , शिल्पकार साहित्य कला मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते . याप्रसंगी शिल्पकार साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष नरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुमधुर आवाजात गायकांनी , ” गुरुवर्य जीवन घोडके ” यांच्या शिष्यांनी गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला , यावेळी मोठ्या संख्येने कलाप्रेमी उपस्थित होते.




