Uncategorizedदिल्ली NCR

…….” छत्रपती शाहूजी महाराज जयंती निमित्त कर्जत बुद्धनगर येथे उद्या मोफत नेत्र तपासणी शिबीर “……

" डॉ. सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ " यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन !

नगरसेविका सौ. सुमिता योगेश गायकवाड , समाजसेवक योगेश आप्पा गायकवाड व भीम गर्जना मित्र मंडळाचा पुढाकार…… 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषद हद्दीतील कर्जत बुद्ध नगर प्रभाग क्रमांक ४ मध्ये ” छत्रपती शाहूजी महाराज जयंती ” निमित्त डॉ. सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नगरसेविका सौ. सुमिता योगेश गायकवाड व भीम गर्जना मित्र मंडळाच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी १० ते १ पर्यंत ठिकाण – कर्जत बुद्ध नगर, समाज मंदिर , कर्जत – रायगड येथे आयोजन करण्यात आले आहे .

          कर्जत नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ सुमिता योगेश गायकवाड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते योगेश आप्पा गायकवाड यांच्या पुढाकाराने तसेच व्यवस्थापक भीम गर्जना मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रमात नेहमीच पुढाकार असतो . आरक्षणाचे जनक ” छत्रपती शाहूजी महाराज ” यांच्या जयंतीचे औचित्य साधून ” मोफत नेत्र तपासणी शिबिराचे ” आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे . 

           या मोफत नेत्र तपासणी शिबिरात १) डोळ्यांची संपूर्ण तपासणी , २) मोतीबिंदूचे ऑपरेशन, ३) चष्म्याचा अचूक नंबर काढून देणे , ४) डोळ्यांच्या तिरळेपणाची तपासणी , ५) डोळ्यांच्या आतील पडद्याची तपासणी , ६) काचबिंदूची तपासणी , आदींचे आयोजन करण्यात आले आहे .

            डॉ. सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत नेत्र तपासणी शिबिरात सहकार्य होणार आहे . तर व्यवस्थापक ” भीम गर्जना मिन्न मंडळ ” बुद्ध नगर कर्जत हे मदत कार्य करणार आहेत , तरी या मोफत नेत्र तपासणी शिबिरात उपस्थित राहून आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्या , असे आवाहन व विनंती ” सौ. सुमिता योगेश गायकवाड ” नगरसेविका क.न.प. प्रभाग क्रमांक ४ व सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते ” योगेश (आप्पा) मारुती गायकवाड – समाजसेवक ” यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!