…….” राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ. सुमिता गायकवाड , समाजसेवक योगेश आप्पा गायकवाड व भीम गर्जना मित्र मंडळाचे ” छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज ” जयंती निमित्त स्तुत्य उपक्रम “……
कर्जत बुद्धनगर येथे " मोफत नेत्र तपासणी " शिबीरात अनेकांनी केली तपासणी !

” डॉ. सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ” कर्जत यांचे सहकार्य……..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आरक्षणाचे जनक ” छत्रपती राजर्षी शाहू महाराज ” यांची जयंती सणासारखी व सामाजिक उपक्रमाने साजरी करा , हे विश्वरत्न ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांचे बहुमूल्य विचार कर्जत नगर परिषद हद्दीतील बुद्ध नगर प्रभाग क्रमांक ४ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ. सुमिता योगेश गायकवाड , राष्ट्रवादीचे युवा नेते , तथा भीम गर्जना मित्र मंडळाचे सर्वेसर्वा – आधारस्तंभ , समाजसेवक योगेश आप्पा गायकवाड यांच्या पुढाकाराने पुढे घेऊन जात असताना त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिर , समाज मंदिर बुद्ध नगर कर्जत येथे आयोजित करण्यात आले होते . यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक , महिला भगिनी , नागरिक , तरुणांनी या शिबिरात सहभागी होत डोळ्यांची तपासणी केली .

डॉ. सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भीम गर्जना मित्र मंडळ व सावित्रीबाई महिला मंडळ यांच्या पुढाकाराने हे मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले . याप्रसंगी कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती महेंद्र चंदन पाटील, ज्येष्ठ नगरसेवक तथा सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर , गुंडगे येथील नगरसेविका मानसी कानिटकर , आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव , सामाजिक कार्यकर्ते आमिर मणियार , पत्रकार सुभाष सोनावणे , या आलेल्या मान्यवरांचे संतोष अडसुळे , किरण वाघमारे , हिरे , यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

कर्जत नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ सुमिता योगेश गायकवाड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते योगेश आप्पा गायकवाड हे नेहमीच महापुरुषांची जयंती साजरी करताना नागरिकांच्या हिताचे उपक्रम राबवित असतात . अनेकांच्या मागणीनुसार यावेळी हे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते , यांत १) डोळ्यांची संपूर्ण तपासणी , २) मोतीबिंदूचे ऑपरेशन , ३) चष्म्याचा अचूक नंबर काढून देणे , ४) डोळ्यांच्या तिरळेपणाची तपासणी , ५) डोळ्यांच्या आतील पडद्याची तपासणी , ६) काच बिंदूची तपासणी , अश्या विविध व्याधीग्रस्त नागरिक व महिला वर्गाने या शिबिरात तपासणी केली . जवळ जवळ ८० रुग्णांनी या शिबिरात तपासणी करून त्यांना चष्मे , औषध , व इतर माहिती देण्यात आली .

डॉ. सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांचे डॉ . अक्षता गायकवाड , मैथिली मराठे , जितेंद्र कोल्हे यांनी रुग्णांची तपासणी केली . तर व्यवस्थापक ” भीम गर्जना मित्र मंडळ व सावित्रीबाई महिला मंडळ ” यांच्या सदस्यांनी या शिबिरात मदत – सहकार्य केले . यावेळी ” सौ. सुमिता योगेश गायकवाड ” नगरसेविका क.न.प. प्रभाग क्रमांक ४ व सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते , समाजसेवक ” योगेश (आप्पा) मारुती गायकवाड ” यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले , व भविष्यात देखील नवनवीन उपक्रम , शिबिरे घेऊन नागरिकांची सेवा करू , असे मत याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते योगेश आप्पा गायकवाड यांनी व्यक्त केले .





