…..” कर्जत तालुक्यात आरक्षण उपवर्गीकरण ” च्या विरोधात सर्व पक्षीय – बहुजन वर्गाचा भव्य क्रोध मोर्चा “…….
" आरक्षण आमच्या हक्काचे - नाही कोणाच्या बापाचे " , ५९ जातीत फूट पाडणाऱ्या शासनाचा निषेध !

खबरदार जर ” घटनेने ” दिलेले अधिकार ” धोक्यात ” आणाल तर , राज्य सरकारला ” संतप्त ईशारा “……..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो , आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे , ५९ जातीत फूट पाडणाऱ्या शासनाचा निषेध असो , छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो , संत रोहिदासांचा , संत वाल्मीक महाराजांचा विजय असो , अश्या गगनभेदी घोषणा देत आज कर्जत तालुका दणाणून गेला . अनुसूचित जाती / जमाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयास संतप्त तीव्र विरोध करत आज मंगळवार दिनांक १४ जुलै २०२६ रोजी कर्जत तालुक्यातील सर्व पक्षीय बहुजन वर्ग रस्त्यावर उतरला . खबरदार जर ” घटनेने ” दिलेले अधिकार ” धोक्यात ” आणाल तर , असा राज्य सरकारला निर्वाणीचा ” संतप्त ईशारा ” या क्रोध मोर्चातून देण्यात आला .
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष , भारतीय बौद्ध महासभा , अखिल भारतीय बौद्ध महासंघ , चर्मकार बहुजन महासंघ , कर्जत तालुका वाल्मिकी समाज , आदिवासी कृती महासमिती , व इतर सर्व बहुजन समाजाच्या वतीने कर्जत तालुक्यात ” आरक्षण उपवर्गीकरण ” च्या विरोधात भव्य क्रोध मोर्चा काढण्यात आला . प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून या भव्य मोर्चाची सुरुवात झाली . जुने जकात नाका – कर्जत बाजारपेठ – श्री कपालेश्वर मंदिर – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून पुढे भव्य क्रोध मोर्चा प्रशासकीय भवन येथे जाऊन कर्जत तहसीलदार धनंजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांना निवेदन देऊन त्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्याची मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली .


शासनाकडून आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची जी चर्चा सुरू आहे त्यास आमचा कडाडून विरोध आहे. आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी दिले आहे. ” उपवर्गीकरणा मुळे समाजात फूट पडेल, बंधुभाव नष्ट होईल आणि घटनेने दिलेला समानतेचा अधिकार धोक्यात येईल ” म्हणून उपवर्गीकरणाचा कोणताही निर्णय घेऊ नये. सध्याचे आरक्षण जसे आहे तसेच सर्व घटकांसाठी लागू राहावे , अशी मागणी याप्रसंगी मोर्चेकऱ्यांनी निवेदनातून केली .
याप्रसंगी आर पी आय पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तमभाई जाधव , आर पी आय पक्षाचे कर्जत ता. प्रभारी अध्यक्ष मनोज भाई गायकवाड , चर्मकार समाजाचे भारत वाघमारे , भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष बी एच गायकवाड , वाल्मीक समाजाचे जगदीश परदेशी , अखिल भारतीय बौद्ध महासंघ बाळा धनवे , नगरसेवक रामदास गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते शरद दादा मोरे , आर पी आय कर्जत ता. अध्यक्षा सौ. सुरेखा कांबळे यांनी सरकारच्या या गळचेपी धोरणाविरोधात संतप्त मत व्यक्त केले .

यावेळी या संतप्त भव्य क्रोध मोर्चास आरपीआय कोकण उपाध्यक्ष मारुती दादा गायकवाड, एसआरपी चे कर्जत ता. अध्यक्ष प्रभाकर दादा गोतारणे , मा. राजिप समाज कल्याण सभापती सुभाष दादा गवळे , आरपीआय चे शहर अध्यक्ष अरविंद मोरे , महिला अध्यक्षा वैशाली भोसले , दिपक भालेराव , माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड , सुभाष गायकवाड , इरेश्वर गायकवाड , निलेश डोळस , राजू जगताप, सुनील सोनावणे , सुरेश सोनावणे , राहुल गायकवाड , एसआरपी कर्जत शहर अध्यक्ष सुभाष सोनावणे , प्रकाश जाधव , संजीव ढोले , गौतम ढोले , सुनील चव्हाण , आप्पा साळवे , चंद्रकांत धनवटे , मनोहर ढोले , प्रदीप मोरे , सुक्कु वाघेला , मा. नगरसेवक दिपक मोरे , ॲड . उत्तम गायकवाड , अमर जाधव , किशोर जाधव , आलोक डाळींबकर आदी सर्व क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते .
त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यातून सर्व बहुजन समाज , सर्व संघटनांचे पदाधिकारी , कार्यकर्ते , महिला वर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यास उपस्थित होता .





