दिल्ली NCR

…..” कर्जत नगरपरिषदेचा अंकुशहीन कारभार , रात्री १ वाजता मुसळधार पावसात बाजारपेठेत खड्डे भरण्याचे काम “…..

अनेक नागरिकांनी व्यक्त केला संताप !

गट नेते ” ॲड. संकेत दादा भासे ” यांची पालिकेच्या ” अजब कारभारावर ” नाराजी…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

गेली ५ दिवस सर्वत्र व कर्जतमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे . उल्हास नदीचे पाणी कर्जत शहरात घुसते की काय ? या विचारात नदी किनारी राहणारे कुटुंब पावसाकडे ” डोळे ” लावून बसले असताना शासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली होती . ” धुवांधार पाऊस ” पडत असल्याने रात्री ” विजेचा प्रवाह ” देखील गेला होता . सर्वत्र ” चिडीचूप ” असताना कर्जत नगर परिषदेचा रस्त्यावरील खड्डे भरणारा ” ठेकेदार ” मात्र उन्ह असताना खड्डे भरण्याचे सोडून भर मुसळधार पावसात मुहूर्त शोधून ” खड्डे ” भरण्यासाठी ” झोपेतून जागा ” होऊन काम करत होता . असे काम टिकणार आहे का ? ठेकेदाराच्या या ” गलथान व बेजबाबदार ” कामामुळे व कर्जत नगर परिषदेच्या ” अंकुशहीन ” कारभाराचा सर्वत्र संताप व्यक्त होत असताना दिसत आहे . याविरोधात कर्जत नगर परिषदेचे गटनेते ” ॲड. संकेत दादा भासे ” यांनी संताप व्यक्त करत पालिकेच्या व परिवर्तन विकास आघाडीचे सत्ताधाऱ्यांच्या अश्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे .

          कर्जत नगर परिषद हद्दीतील सर्वच प्रभागात नवीन पाणी योजनेचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे . पावसाला सुरुवात होईल , त्या अगोदर जलद गतीने कामे करा , असा आदेश नगर परिषदेच्या ना मुख्याधिकारी यांनी दिले , ना नगराध्यक्षांनी . त्यामुळे आता पावसात सर्वच ठिकाणी चिखलाचे साम्राज्य असताना मुसळधार पाऊस पडत असल्याने पाऊस उघडल्यावर उर्वरित रस्त्यावरील खड्डे भरण्याचे कामे करायची , अशी समज देखील नसणाऱ्या या ठेकेदाराने आपल्या ” अक्कलेचे तारे ” तोडत , रविवारी रात्री १ च्या दरम्यान कर्जत रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या संतोष वाईन्स , महावीर पेठ या परिसरात सिमेंट काँक्रिट मिक्स करून काम करताना अनेक नागरिकांना दिसले .   

        त्यामुळे अनेकांनी अशा भर पावसात , लाईट नसताना , खड्डे भरण्याचे सुरू असलेल्या कारस्थानाविरोधात सोशल मीडियावर व संबंधित ठिकाणी ठेकेदाराच्या या बेजबाबदार कारभाराविषयी व पालिकेच्या मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” व सत्ताधारी परिवर्तन विकास आघाडीच्या ” अंकुशहीन कारभाराचा ” संताप व्यक्त केला . याविरोधात शिवसेनेचे गटनेते ” ॲड. संकेत दादा भासे ” यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे . त्यामुळे कर्जत नगरपालिकेच्या ” अजब कारभाराची ” चर्चा सर्वत्र होत असताना दिसत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!