दिल्ली NCR

……” आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ” शिवशंभो युवा हायकर्स ” कर्जत संस्थेचा सत्कार “……

" सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ", कर्जत यांचा स्तुत्य उपक्रम !

संस्थेचा ” ४० वर्षांचा ” साहसी प्रवास……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

राज्यात – रायगड जिल्ह्यात तसेच कर्जत तालुक्यात उंच उंच गडकोट , हजारो किलोमीटर सायकल प्रवास , निसर्ग संवर्धन तर हिमालया सारखे गिर्यारोहण करून कर्जत तालुक्याचे नाव सातासमुद्रा पलीकडे नेऊन झेंडा डौलाने फडकवत ठेवणारे ” शिवशंभो युवा हायकर्स ” कर्जत या संस्थेचा सत्कार कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार आमदार ” श्री. महेंद्र शेठ थोरवे ” यांचे शुभहस्ते नुकताच कर्जतमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कर्जत यांनी आयोजित केलेल्या स्तुत्य उपक्रमाद्वारे करण्यात आला. यावेळी सागमचे अध्यक्षांसहित अनेक मान्यवर व कर्जत नगर परिषदेचे गटनेते ॲड संकेत दादा भासे उपस्थित होते. 

         शिवशंभो युवा हायकर्स , कर्जत ही संस्था २५ डिसेंबर १९८६ रोजी स्थापन करण्यात आली . सुरुवातीला ” सायकलिंग , गिर्यारोहण व निसर्ग संवर्धन ” यासाठी स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून अनेक सायकल मोहिमा पार पडल्या. त्यातील दोन मोहीमा या १८०० किमी कर्जत – गोवा , बेळगाव परत व १४०० किमी कर्जत – अजिंठा – शेगाव , परत च्या सायकल मोहीमा उल्लेखनीय होत्या.

         कर्जत – तिरुपती – कर्जत २५०० कि.मी. सह्याद्री व हिमालयातील अनेक ” गिर्यारोहण मोहिमा ” संस्थेच्या माध्यमातून यशस्वी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मुख्य पदभ्रमण मोहीम – १)पोखरा व्हॅली पदभ्रमण. २) बियासकुंड, सोलंगनाला पदभ्रमण मोहीम तर हिमालयातील शिखर मोहीम – १) भागीरथी -२ .उंची २१३६४ शिखर चढाई. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने मोटार सायकल मोहिम , हिमाचल प्रदेश. लाहोर – स्पिती व्हॅली. ३५०० कि.मी. सुळके चढाई यांत १)कळकराई सुळका २)ढाक भैरी ३) तैलबैला चढाई ४) गणेश सुळका ५) लुईझा पाॅईंट . याच बरोबर १)गड किल्ले भटकंती , २) पालकांसाठी किल्ले कौटुंबिक सहली. ३) महाराष्ट्र दिना निमित्त विविध क्रीडा स्पर्धा ४) तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धा ५) मॅरेथॉन स्पर्धा ६) गड किल्ले स्पर्धा व प्रदर्शन ७) विविध मोहीमा स्लाईड शो ८) पर्यावरण निबंध स्पर्धा ९) वृक्ष दिंडी व वृक्षारोपण १०) रेस्कु ऑपरेशन प्रशिक्षण ११) आपतकालीन परिस्थितीत बचाव कार्य , अशी साहसी कार्यक्रम घेतले आहेत.

          बाळ मनावर याची आवड निर्माण व्हावी म्हणून ” बाल विकास शिबीर ” यांत १) सतत २६ वर्षे मुलांसाठी गिर्यारोहण प्रशिक्षण शिबिर आयोजन. साधारण २००० मुलांना गिर्यारोहण जुजबी प्रशिक्षण देण्यात आले. २) संस्थेचे माध्यमातून कर्जत मध्ये अनेक प्रशिक्षित गिर्यारोहक तयार झाले.३) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ” शिवचरित्रावर ” व्याख्यान तिन दिवसांचे आयोजन. ४) गिरीश राव जाधव यांचे इतिहास साक्षीदार ” शस्त्र प्रदर्शन ” आयोजन.५) गड किल्ले ” स्वच्छता व संवर्धन ” मोहीमेत सहभाग कार्यक्रमाचे आयोजन केले.

         याबद्दल संस्थेस विशेष गिर्यारोहण संस्था पुरस्कार , गिर्यारोहण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार , गिरीमित्र उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था पुरस्कार २०२५ प्राप्त , असे पुरस्कार तर अनेक संघटनांनी सन्मानित केले आहे. यावेळी २५ डिसेंबर २६ रोजी संस्थेला ४० वर्षे पूर्ण होत आहेत . त्या निमित्ताने संस्थेचे वतीने भरीव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याने ” शिवशंभो युवा हायकर्स कर्जत संस्थेमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते केलेल्या सत्कारामुळे संस्थेचा ” मानांकन ” वाढले असल्याचे मत संस्थेचे संस्थापक सदस्य ” विकास दादा चित्ते ” यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!