दिल्ली NCR
……” कर्जत रेल्वे स्थानकात कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस गाडीत धूर “…..

प्रवासी भयभीत , ब्रेक बाईंडिंग झाली असल्याचे समजले !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आज शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी कर्जत रेल्वे स्थानकावर कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस गाडी मध्ये अचानक धुराचे लोट निघत असल्याने गाडी थांबविण्यात आली. यामुळे गाडीतील प्रवासी भयभीत होऊन गाडीच्या खाली उड्या मारून उतरले.
कोयना एक्सप्रेस पुण्यावरून मुंबई कडे संध्याकाळी जात असताना कर्जतमध्ये आल्यावर , तिला कर्जत थांबा नसल्याने गाडी मधून धूर निघत असल्याने आग लागली की काय ? या भीतीने प्रवासी भयभीत झाल्याने कर्जत स्थानका विरुद्ध भागाकडे उड्या मारून उतरले . काही तांत्रिक बिघाड झाला का ? हे तपासण्यात आले , मात्र प्रवासी , महिला वर्ग उड्या मारून उतरल्याने स्थानकावर एकच कल्लोळ झाला. गाडी ब्रेक बाईंडिंग झाली असल्याचे नंतर समजले .




