…..” १५ ऑगस्ट २०२६ देशाच्या ” स्वातंत्र्य दिनी ” मातोश्री हॉस्पिटलचे ” डॉ. दिग्विजय पवार ” यांचा स्तुत्य उपक्रम “…….
" १५ " सुखरूप डिलिव्हरी करून नवजात बालकांचा जन्म !

कमी फी घेऊन ” डॉ. दिग्विजय पवार ” यांनी ” वीस वर्षांमध्ये दहा हजार डिलिव्हरी ” करण्याचा विक्रम……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” १५ ऑगस्ट २०२६ ” देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागातील नावाजलेले ” मातोश्री हॉस्पिटल ” ने अवास्तव फी न आकारता कमी दरात महिला भगिनींची प्रसूती करून नवजात बालकांना या शुभ दिनी हे ” सुंदर जग ” दाखविण्याचा उपक्रम साकारणारे ” मातोश्री हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. दिग्विजय पवार ” यांनी हे देशव्यापी कार्य केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काल व आज १५ डिलिव्हरी करून त्यांनी महान कार्य केले. या डिलिव्हरी मध्ये आर पी आय महिला आघाडी तालुका अध्यक्ष ” सौ. अलका प्रकाश सोनावणे ” यांच्या नातू ने देखील सुखरूप जन्म घेतला , त्यांचा मुलगा आयु . अतुल प्रकाश सोनावणे व सुनबाई सौ. अक्षदा अतुल सोनावणे यांना मुलगा झाला असल्याने त्यांनी ” डॉ. दिग्विजय पवार व डॉ. स्वाती लाड ” तसेच सर्व स्टाफ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ. दिग्विजय पवार हे गोर गरीब जनतेसाठी एक महत्वाचा दुवा बनले आहेत. त्यांच्या गाठीशी अनेक प्रसूती करण्याचा प्रदीर्घ अनुभव असून, गोर गरीब जनतेकडून कोणतीही ” अवास्तव फी ” न आकारता ” अत्यल्प व परवडणाऱ्या दरात ” शस्त्रक्रिया करण्याचा त्यांचा नावलौकिक आहे. गोर गरीब जनतेसाठी ” देव माणूस ” ठरलेले डॉ. दिग्विजय पवार यांनी २० वर्षांमध्ये १० हजार सुखरूप डिलिव्हरी करण्याचा विक्रम केलेला आहे .

त्यांच्या सोबत या अनमोल डिलिव्हरी कामात ” डॉ. स्वाती लाड ” यांची मदत असून बाळ व महिला बाळंतीण सुखरूप डिलिव्हरी होत असते. त्यांच्या या मातोश्री हॉस्पिटलमध्ये दूर दूर वरून डिलिव्हरी करण्यास अनेक कुटुंब येत असतात. ” डॉ दिग्विजय पवार व त्यांच्या सहकारी डॉ. स्वाती लाड ” यांच्या या महान कार्याला ” जनतेच सरकार ” या न्यूज चॅनल परिवारच्या वतीने आजच्या या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी खूप खूप शुभेच्छा.





