दिल्ली NCR

……” शिवभक्त नदीम भाई खान यांनी श्री गणेशोत्सवानिमित्त सर्व भाविक – भक्तांना व कर्जतकर नागरिकांना शुभेच्छा केल्या व्यक्त “……

” बाप्पा ” आणि ” शिवभक्त नदीम भाई ” यांचे बालपणापासून दृढ संबंध ! 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषदेच्या खाटिक आळी परिसरात रहाणारे पण ” सर्वधर्म समभावाची ” शिकवण घेऊन लहानाचे मोठे होत असताना आपल्या बालपणापासूनच ” शिवभक्त नदीम भाई युसुफ खान ” यांचे सर्वच सण उत्सवात प्रथम दर्शनी सहभाग व आनंद व्यक्त करण्याचा स्वभाव असल्याने पाटील आळी , धापया मंदिर परिसरात होणाऱ्या प्रत्येक सण उत्सवात त्यांचे दृढ संबंध आजवर दिसण्यात येत आहेत. 

 

          आपल्या परिसरात ” शिवसेना ” या पक्षाचा त्यांच्या बालवयातच मनावर शिकवण झाल्याने ” शिवसेनाच ” माझी जात व धर्म असे विचार घेऊनच ते तरुणपणात आले. शिवसेनेच्या प्रखर अग्निकुंडातील विचारांचा पगडा अगदी तरुण वयातच नदीम भाई खान यांच्या मनावर होता , म्हणूनच सन २००७ साली शिवसेना प्रमुख ” बाळासाहेब ठाकरे ” यांच्या या ज्वलंत विचारांचे वादळ त्यांच्या मनामनात रुजले . ” शिवसेनाच माझी जात – माझा धर्म ” अशी संकल्पना घेऊन नदीम भाई खान आजही येथील स्वर्गीय ” अनंत काका जोशी ” व त्यानंतर कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सन २०१४ , २०१९ व आता २०२४ अश्या सर्वच जय – पराजयाच्या निवडणुकीत ते आपले राजकीय गुरू २ वेळा विजयी झालेले कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या पाठीशी ठाम उभे रहात त्यांच्या प्रचारात अग्रस्थानी राहिले आहेत . व बहुतांश सर्व समाजाची मते त्यांच्यामुळे मिळाल्याचे दिसून आले. म्हणूनच आताच्या झालेल्या अटीतटीच्या लढाईत त्यांच्या विजयात नदीम भाई यांचा देखील खारीचा वाटा असल्याचे दिसून येत आहे . 

          हिंदू – मुस्लिम – बौद्ध – जैन समाज तर इतर समाजाच्या सर्व सण उत्सवात , महापुरुषांच्या जयंती महोत्सवात ते नेहमीच हिरीरीने भाग घेऊन सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम करत असतात. आपल्या परिसरात देखील ” माघी गणेशोत्सव ” ते गेली अनेक वर्षे साजरा करत आले आहेत. विघ्नहर्ता ” बाप्पा ” चे आशीर्वाद घेऊन ते आपल्या जीवनात ” महेंद्र गडावरून ” राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक – सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करताना दिसत आहेत. जात – धर्म फक्त आपल्या घराच्या चार भिंतीत असून बाहेरच्या जगात आपण अनेक जाती धर्माशी जोडले गेलो आहोत , म्हणूनच सर्वधर्म समभाव – माणुसकी , हिच वागणूक योग्य असल्याचे ते नेहमीच सांगत असतात. म्हणूनच त्यांची सांगड व अनेक मित्र सर्व जातीचे – धर्माचे असल्याचे दिसून येत आहे. मदतीचा हात हा कधीच कुठल्या पंथाचा नसतो , हेच त्यांच्या मदत कार्यातून दिसून येत आहे. अपघात झालेल्या रुग्णाला दवाखान्यापर्यंत नेऊन सर्वतोपरी मदत हेच त्यांनी बाप्पाच्या सानिध्यात राहून शिकलो असल्याने , त्यांची धडपड – मदत सर्व समस्यांत दिसून येते. 

          जाती पातीचे बंधन झुगारून श्री गणेश , विघ्नहर्ता बाप्पाचे दर्शन आजच्या दिनी घेऊन त्यांनी ” श्री गणेशोत्सवानिमित्त ” सर्व भाविक भक्तांना व कर्जतकर नागरिकांना मनापासून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत तर बाप्पांचे आशीर्वाद सर्वांवर राहू दे , अशी प्रार्थना ” शिवभक्त नदीम भाई खान ” यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!