…..” कर्जतमध्ये आशीर्वादाचा एक ” दिवा ” उपक्रम उत्साहात “……

भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव ” सुनील गोगटे ” यांचा पुढाकार !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
देशाचे लाडके पंतप्रधान माननीय ” नरेंद्रजी मोदी साहेब ” यांच्या वाढदिवसानिमित्त “आशीर्वादाचा एक दिवा ” हा संकल्प राबविताना समाजातील अबालवृद्ध, महिला-भगिनी, कामगार, व्यापारी तसेच विविध स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमाचा पुढाकार किसान मोर्चा प्रदेश सचिव तथा भाजपचे कर्जत तालुक्याचे नेते सुनील गोगटे यांनी घेऊन कर्जतमध्ये राबविला.


या उपक्रमा दरम्यान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ” आनंद आणि उत्साह ” पाहायला मिळाला. आपल्या महान नेत्याच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि देशसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू राहावे , यासाठी एक ” दिवा ” प्रज्वलित करून शुभेच्छा व आशीर्वाद देण्याचे भाग्य आम्हाला लाभले, अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

हा केवळ एक ” दिवा ” नव्हता, तर आपल्या नेत्याप्रती असलेल्या प्रेमाचा, आदराचा आणि सदिच्छांचा प्रकाश होता , असे मत किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे यांनी व्यक्त करत या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.





