दिल्ली NCR

…..” आरोप करता ते सिद्ध करा , नाहीतर माफी मागा – शिवसेना खालापूर युवा प्रमुख रोहित विचारे

" टाटा - गोदरेज " कंपनी बाबतीत केलेले आरोपांची खातरजमा करा , " राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे " यांना सल्ला !

आम्ही स्थानिक असल्यानेच आम्हाला कामे मिळाली , ” रोहित विचारे ” यांचा राष्ट्रवादीला पलटवार……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत खालापूर मतदार संघात ” टाटा – गोदरेज ” कंपनी मध्ये आम्ही स्थानिक असल्यानेच कंपनीचे नियम पाळून आम्हाला कामे मिळाली आहेत , यावर प्रकाश टाकत आपल्या अवती भोवती असलेलेच हफ्ते व कामाला लावताना पैसे घेत असतील , म्हणून पहिले खातरजमा करा , व मगच आरोप करा ,व केलेले आरोप सिद्ध करा , अन्यथा माफी मागा , असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना शिवसेनेचे खालापूर युवा सेना प्रमुख रोहित विचारे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे .

              यावेळी रोहित विचारे यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावर होत असलेले आरोप हे खोटे असल्याचे सांगत , अनेक विषयांवर मुद्दे मांडले. आम्ही स्थानिक आहोत , म्हणूनच आम्ही कामे घेतो , तसेच इतर पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा घेतात , यावर त्यांनी प्रकाश टाकून केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध केले.

           बाळासाहेब भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा युवा सेना प्रमुख प्रसाद थोरवे , गटनेते ॲड. संकेत दादा भासे , कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , त्याचप्रमाणे अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!