…..” सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – कपालेश्वर देवस्थान समिती – आणि शिवतांडव प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज पथक , कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जतमध्ये रक्तदान शिबिर संपन्न “…..
कर्जत - खालापुर तालुक्यातील " ५४३ वे " रक्तदान शिबिराचे आयोजन !

सार्वजनिक रक्तदाते – महारक्तवीर ” राजाभाऊ कोठारी सर ” यांचा पुढाकार…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , कपालेश्वर देवस्थान समिती आणि शिवतांडव प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज पथक ,कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत – खालापुर तालुक्यातील ५४३ वे रक्तदान शिबिराचे आयोजन सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर यांच्या पुढाकाराने रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत श्री कपालेश्वर मंदिर – कर्जत येथे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी एकूण ३८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक, राष्ट्रीय व मानवतावादी कार्य करुन सहकार्य केले.

याप्रसंगी १४ रक्त दात्यांचे हिमोग्लोबीन कमी भरल्यामुळे त्यांना रक्तदान करता आले नाही. या रक्तदान शिबिरात ” निलेश हरिश्चंद्रे ” यानी रक्तदान शिबिराची सुरूवात केली.याप्रसंगी ” अजय घरत ” या रक्तदात्यांनी वैयक्तिक आपले ५४ वे रक्तदान केले , तसेच ” ॲड. योगेश देशमुख ” या रक्तदात्यांनी वैयक्तिक आपले ५२ वे रक्तदान केले तर ” अक्षय सुरेशभाऊ लाड ” या रक्तदात्यांनी वैयक्तिक आपले २६ वे रक्तदान केले , तर राहुल सोनावणे याने पहिल्यांदाच रक्तदान केले.

यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे भालचंद्र जोशी , संदिप भोईर ,अभिजीत मराठे , सदानंद जोशी , मंदार लेले , विवेक भागवत , बाली परदेशी , रोनक कोठारी , खैरे काका , बंटी लोवंशी , सर्वेश गोगटे , तसेच शिबिरात प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज पथक कर्जतचे नमित दांडेकर , नारायण भोईर , रोहित कानडे , रितेश जाधव , निहार व्यापारी , राज पाटील , साहिल गोरे व कपालेश्वर देवस्थान व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष महेंद्र बोडके उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरात रक्त संकलनाचे काम घाटकोपर येथील ” समर्पण रक्तकेंद्राचे ” डॉ.अनिस गाला,नर्स अनिता सिस्टर.टेक्निशियन अनघा मॅडम,टेक्निशियन शिल्पा संघवी, प्रदीप नितोरे, श्रीराम नाईक,मंगेश कांबळे व इतर आरोग्य सेवकांनी उत्तम पद्धतीने केले .

हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम करणाऱ्या , रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्वांचे , तसेच सर्व कार्यकर्त्यांचे मनःपुर्वक आभार सार्वजनिक रक्तदाते – महारक्तविर तथा नगरसेवक राजाभाऊ कोठारी सर यांनी व्यक्त केले .





