…..” दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व मारहाण प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा , कर्जतमध्ये आर पी आय पक्षाची मागणी !
शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडण्याचा सर्वांना " घटनात्मक " अधिकार !

आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” संतप्त…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
दिल्ली येथील जंतर-मंतर आंदोलना दरम्यान ” विद्यार्थ्यांवर ” तेथील पोलीस यंत्रणेने ” अमानूष लाठी हल्ला ” करून अनेक विद्यार्थ्यांना जखमी केले होते , याविरोधात देशभरात असंतोष पसरला होता व अनेक ठिकाणी संतप्त आंदोलने झाली होती . त्यामुळे या झालेल्या कथित लाठीचार्ज व मारहाण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत व कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” यांनी आज सोमवार दिनांक २७ जुलै २०२६ रोजी कर्जत येथे तहसीलदार धनंजय जाधव व कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना निवेदन सादर केले. 
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांना बळाचा वापर करून विद्यार्थी व विद्यार्थिनींना अमानवीय लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांमुळे अनेक जण जखमी तर अनेकांवर अद्यापि उपचार सुरू आहेत . या घटनेबाबत देशभरातून तीव्र संताप व्यक्त झाला . विद्यार्थ्यांवर जर कायद्याच्या मर्यादेबाहेर जाऊन बलप्रयोग करण्यात आला असेल, तर त्या घटनेची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे , असे संतप्त मत आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी व्यक्त करत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला . 
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला, तसेच विद्यार्थ्यांना शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. अशा परिस्थितीत संबंधित घटनेची सखोल चौकशी करून, कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. यावेळी त्यांनी , दिल्ली येथील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व मारहाण प्रकरणाची निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लागू असलेल्या कायद्यानुसार गुन्हे नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आंदोलना दरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय मदत व योग्य ती मदत/भरपाई देण्यात यावी. भविष्यात शांततापूर्ण आंदोलनां दरम्यान विद्यार्थी व नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. असे निवेदनात ठाम मागणी केली आहे . 
त्याअनुषंगाने आपण महाराष्ट्र शासनामार्फत व संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे हे निवेदन तातडीने पाठवून पुढील कार्यवाही करण्याची शिफारस आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी केली. आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली यावेळी मालु निरगुडा – आदिवासी समाज रायगड जिल्हा अध्यक्ष , किशोर गायकवाड – कर्जत तालुका संपर्कप्रमुख , अशोक गायकवाड – कर्जत तालुका सचिव , प्रेमनाथ जाधव – आर पी आय कर्जत तालुका प्रवक्ते , ॲड. उदय जाधव – कर्जत शहर अध्यक्ष, आर पी आय कर्जत तालुका महिला अध्यक्षा अलका सोनावणे , बबन गायकवाड – भारतीय बौद्ध महासभा कर्जत तालुका अध्यक्ष , हरिश्चंद्र जाधव सर – सामाजिक कार्यकर्ते , संजय जाधव – भारतीय बौद्ध महासभा कार्यकर्ते , मारुती चव्हाण – सरपंच कोंडीवडे , कोमल चंदनशिवे – मा. शहराध्यक्ष नेरळ , रवींद्र जाधव – नेरळ शहर अध्यक्ष , प्रवीण गायकवाड – आरपीआय कार्यकर्ता , उज्वला सोनावणे – आरपीआय कार्यकर्ते , संदीप गायकवाड – आरपीआय कार्यकर्ते , त्याचप्रमाणे मयूर गायकवाड, विशाल गायकवाड, अतुल सोनावणे, सुमित गायकवाड , मुकेश आढाव , विजय गायकवाड ( कर्जत तालुका प्रसिद्धीप्रमुख आरपीआय ) व अनेक आंबेडकरी अनुयायी , बहुजन समाजाचे मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.




