Uncategorizedदिल्ली NCR

…..” या जन्मावर – या जगण्यावर , शतदा प्रेम करावे , कर्जत मधील दिलखुलास नेतृत्व सुनील गोगटे ” ……

" सामाजिक कार्य आणि सेवा व्रत " हेच त्यांचे खरे , सार्वजनिक जीवनाचे अधिष्ठान !

भाजप नेते ” सुनील गोगटे ” म्हणजे विकास कार्यासाठी लढणारे लढवय्ये नेतृत्व……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

” सामाजिक कार्य आणि सेवा व्रत हेच खरे सार्वजनिक जीवनाचे अधिष्ठान ” असून गोर – गरीब – गरजू नागरिकांसाठी केलेले कार्य सर्वदूर ” चंदनाच्या सुगंधासारखे ” पसरत जाते , व त्यातून मिळालेल्या ” पुण्याईच्या ” शिदोरीला बहुमूल्य महत्त्व असते , असे वडिलोपार्जित ” मदतीचे व परोपकाराचे ” कार्य अखंडीत सुरू ठेवणारे कर्जत मधील भारतीय जनता पार्टीचे नेते तथा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष , मा. नगरसेवक ” मा. श्री. सुनील सदाशिव गोगटे ” कर्जत तालुक्यातील विकास कार्याचे ” लढवय्ये नेतृत्व ” म्हणून ओळखले जातात .

         भाजप नेते ” मा. सुनील गोगटे ” हे नेहमीच आपल्या कर्जत विठ्ठल नगर येथील जनसंपर्क कार्यालयातून सामाजिक कार्य व विविध उपक्रम राबवित असतात . गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असो, शेतकऱ्यांना मोफत खत वाटप असो, महाआरोग्य शिबिरांचे आयोजन असो. मोफत छत्री वाटप , रेनकोट वाटप , कर्जत नगर परिषद हद्दीतील विठ्ठल नगर परिसरातील भाजप नेते सुनील गोगटे यांच्या संपर्क कार्यालयातून ” १२ महिने २४ तास ” मदतीचे कार्य अखंडित सुरू असते .

           सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य शिबिर , नेत्र तपासणी शिबिर , मोफत चष्मे वाटप , नागरिकांना माफक दरात ऐकू येण्यासाठी कानाचे यंत्र वाटप , शासकीय योजनांचे मार्गदर्शन व नोंदणी , शेतकरी बांधवांना पेन्शन योजना नोंदणी , मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नोंदणी , मतदार नाव नोंदणी , पदवीधर मतदार नोंदणी , जेष्ठ नागरिक मतदार नोंदणी , असंघटित कामगार नोंदणी , पालिकेच्या स्वच्छता कामगारांना रेनकोट वाटप , जेष्ठ नागरिक , शालेय विद्यार्थी , कॉलेज तरुण , नाका कामगार , व गरजू नागरिक , महिला भगिनींना छत्री वाटप , शेतकरी बांधवांना मोफत खते वाटप , गरीब गरजू नागरिकांना शालेय , आरोग्य , शासकीय कार्यालयात मदत , तर या मतदार संघात विकास कार्य व्हावे म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे व राज्यातील मंत्र्याकडे करत असलेली वारी , टोल माफी , नवी मुंबई बस सेवा , कामगारांना न्याय , अशी उल्लेखनीय विविध कार्य त्यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालयातून होत असतात . आलेल्या गरजवंताला रिकाम्या हाती पुन्हा कधीच ते पाठवत नसल्याने आपल्या ” हक्काचा माणूस ” म्हणून त्यांच्याकडे सर्व जाती धर्माची लोक पहात असतात .

         कर्जत तालुक्यात भारतीय जनता पक्ष व किसान मोर्चाचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली चोख व मोठ्या उमेदीने सुरू असून यांत सुनील गोगटे यांचा खारीचा वाटा आहे . या त्यांच्या कार्यात पत्नी स्नेहा व पुत्र सर्वेश यांची व कुटुंबातील सदस्यांची साथ सावली सारखी असते . त्यांचे हे कार्य अधिक ” तेजोमय ” होवो , असेच ” आशीर्वाद व शुभेच्छा ” त्यांच्या आज असलेल्या शनिवार दिनांक २७ जून २०२६ या ” जन्मदिनाच्या ” निमित्ताने विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, भाजप परिवार , मित्र , जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक , कष्टकरी , कामगार वर्ग , महिला भगिनी करताना दिसत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!