…..” कर्जत रेल्वे स्थानक परिसरात झाड तोड मोहीम “……
जुने अवाढव्य असलेले " रानटी झाडाच्या फांद्या क्रेन च्या साहाय्याने तोडले !

कर्जत रेल्वे प्रवासी घेणार मोकळा श्वास…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत रेल्वे स्थानकाच्या बाहेर परिसरात असलेले अनेक वर्षांपूर्वीचे अवाढव्य रानटी झाड खूपच वाढलेले होते . त्यामुळे त्या झाडाच्या फांद्या पाऊस व वाऱ्यामुळे पडण्याची भीती होती . रेल्वे प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेत नुकतीच रेल्वे प्रशासनाने हे ” झाड तोड ” मोहीम राबवली.

या परिसरात झाडाखाली एक हॉस्पिटल आहे , तर बाजूलाच रेल्वेची २ चाकी वाहनांची पार्किंग आहे . शिवाय हा परिसर वाहतुकीचा व प्रवासी जाण्या येण्याचा मार्ग असल्याने झाड तुटायची भीती होती . याच झाडावर २ वर्षांपूर्वी ” वीज ” देखील पडली असल्याने या झाडाच्या फांद्या कधीही तुटेल , याची शाश्वती नव्हती . तर झालेल्या मुसळधार पावसात या परिसरातील जांभळाचे झाड बाहेरील दुकानावर पडल्याने नागरिक व व्यापारी वर्गाने केलेल्या तक्रारीवरून बुधवार दिनांक १५ जुलै २०२६ रोजी हे ” झाड तोड ” मोहीम क्रेन च्या साहाय्याने माणसे वर नेवून इलेक्ट्रिक कटर च्या मदतीने पोलीस बंदोबस्तात कापण्यात आले .

रेल्वेच्या या परिसरात प्रवाशांच्या जीवाला धोका असलेल्या ” झाड तोड ” मोहीम मुळे रेल्वे प्रवाश्यांना नक्कीच ” दिलासा ” मिळाला आहे .




