……” गटनेते तथा नगरसेवक ॲड. संकेत भासे आणि नगरसेविका जान्हवी सुदेश देवघरे यांच्या मागणीला यश “…….
दहिवली प्रति अयोध्या येथे " सीसीटीव्ही कॅमेरे " मागणीला अखेर यश !

नागरिकांच्या ” प्रश्नांसाठी ” सातत्याने पाठपुरावा असाच सुरू राहणार – विरोधी पक्षनेते ॲड संकेत दादा भासे
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागात ” प्रति अयोध्या ” परिसरातील सुरक्षितता व सुव्यवस्था लक्षात घेऊन गटनेते ” ॲड. संकेत दादा भासे ” व स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेविका ” जान्हवी सुदेश देवघरे ” यांनी दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी ” सीसीटीव्ही कॅमेरे ” बसविण्याची मागणी करण्यात आली होती. याकरिता ” दहिवली गाव विचार मंच ” च्या माध्यमातूनही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर या मागणीला यश मिळाले असून प्रति अयोध्या परिसरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

सदर कॅमेरे थेट कर्जत पोलीस ठाण्याच्या नियंत्रणाखाली असणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन आढळून आल्यास संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यास मदत होणार आहे.

तसेच गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जास्त पावसामुळे परिसरात झालेला चिखल लक्षात घेऊन GSB भरून रस्ता सोईस्कर करण्यात आला , त्यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांची ये-जा सुलभ होणार आहे .

यानिमित्ताने कर्जत नगरपरिषदेचे व नगराध्यक्षा यांचे मनःपूर्वक आभार ॲड. संकेत दादा भासे यांनी व्यक्त केले असून नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा असाच सुरू राहणार , असे मत विरोधी पक्षनेते ॲड संकेत दादा भासे यांनी व्यक्त केले आहे.




