दिल्ली NCR

…..” उमेश आप्पा म्हणजे राजकीय – सामाजिक – शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी त्रिवेणी संगम “……

" मा. उपनगराध्यक्ष उमेश आप्पा गायकवाड " यांचा वाढदिवस अनेक उपक्रमाने साजरा !

ज्या गुंडगे गावातील नागरिकांनी मला ” आप्पा ” पद दिले त्यांची सेवा मी सदैव करणार – उमेश आप्पा गायकवाड 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

…..” उमेश आप्पा म्हणजे राजकीय – सामाजिक – शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी त्रिवेणी संगम “……अश्या अनमोल शब्दाने कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागाचे मा. उप नगराध्यक्ष ” उमेश आप्पा गायकवाड ” यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खांडपे ग्रामपंचायतीचे मा. सरपंच ” मधुकर भाऊ घारे ” यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाल व पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

          बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी गुंडगे प्रभागात सकाळी ” वृक्षारोपण व बसण्यास बाकडे ” वाटप कार्यक्रम करण्यात आला , तर संध्याकाळी ७ .०० वाजता छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज चौक – गुंडगे येथे सीसीटीव्ही कॅमेरा चे लोकार्पण व गुंडगे समाज मंदिराचे उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खांडपे मा. सरपंच मधुकर भाऊ घारे , कर्जत ता. अध्यक्ष दिपक श्रीखंडे , लाडीवली मा. सरपंच जगदीश ठाकरे , यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

        यावेळी समाज मंदिर गुंडगे येथेच आयोजित केलेल्या ” अभिष्टचिंतन सोहळ्यास ” दरवर्षी ०१ जुलै हा दिवस गुंडगे येथे या प्रभागाचे ” विकास पुरुष “, व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खंदे नेतृत्व उमेश आप्पा गायकवाड यांचा वाढदिवस राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक – सांस्कृतिक – कला क्रीडा , क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना – विद्यार्थ्यांना – महिला भगिनींना – ज्येष्ठांना सन्मानित करण्यात येत असते . यावर्षी देखील अनेक सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असताना समाज मंदिरासाठी लाखो रुपयांचा निधी सुधाकर भाऊ घारे यांच्या सहकार्यातून खर्च करून येथे विकास कामे होत असल्याचे राष्ट्रवादीचे युवा नेते योगेश आप्पा गायकवाड यांनी यावेळी समाज मंदिर गुंडगे येथेच आयोजित केलेल्या ” अभिष्टचिंतन सोहळ्यास ” मत व्यक्त केले .

          तर जगदीश ठाकरे म्हणाले की , गेली अनेक वर्षे उमेश आप्पा यांची राजकीय कार्यकीर्द मी बघितली आहे , ” अपयश ही यशाची पहिली पायरी ” हे ओळखून प्रथम निवडणुकीत पराजय होऊनही ते नागरिकांची सेवा करत राहिले म्हणून नागरिकांनी त्यांना ३ वेळा निवडून दिले . गुंडगे गावाची सेवा ते आजपर्यंत करत असून विकासाची गंगा त्यांनी येथे आणली आहे , म्हणूनच मुंबई करांची पसंती आज गुंडगे गाव झाले आहे . मित्रासाठी देखील त्यांचे खूप अनमोल काम आहे , हे माझ्या निवडणुकीत आप्पांनी केलेल्या कामावरून दिसले , हे सांगितले . बहुजनांचे नेते म्हणून ते उदयास येत आहेत , पुढील काळात कर्जत नगरीचे ” नगराध्यक्ष होवो ” या शुभेच्छा त्यांनी याप्रसंगी दिल्या .

       

           राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दिपक श्रीखंडे यांनी मैत्री कशी जपावी , हे उमेश आप्पा कडून शिकावे , असे मत व्यक्त करत दीर्घायुषी व्हा , अश्या शुभेच्छा दिल्या . राहुल गायकवाड सर म्हणाले की गुंडगे प्रभागात दरवर्षी वृक्षारोपण करून खऱ्या अर्थाने हरित क्रांती उमेश आप्पा गायकवाड यांनी केली असल्याचे सांगितले . माथेरान आर पी आय मा.अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी उमेश आप्पा यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त ५३ वेळा उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या . देशमुख सर म्हणाले की , उमेश आप्पा सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत आहेत , अनेक गरीब विद्यार्थांना शैक्षणिक मदत , अनेक विद्यार्थी दत्तक घेतले आहेत , आजारी रुग्णांना नेहमीच त्यांची मदत असते , परिपक्व स्वभावाचे व्यक्तिमत्व असल्याचा सन्मान त्यांनी केला . सीताराम कांगणे सरांनी मत मांडताना उमेश आप्पा खूप परिश्रम घेऊन नगरसेवक , बांधकाम सभापती ते उपनगराध्यक्ष अशी राजकीय क्षेत्रात उच्च स्तरावर झेप घेतली आहे , असे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या.

          यावेळी सत्कारमूर्ती मा. उप नगराध्यक्ष उमेश आप्पा गायकवाड म्हणाले की , ज्या गुंडगे गावातील नागरिकांनी मला ” आप्पा ” हे पद दिले त्यांची सेवा मी सदैव करणार , या प्रभागात अजून करोडो रुपयांचा निधी येत्या सहा महिन्यात आणून कायापालट करणार , यांत चर्मकार समाजासाठी सभागृह , गार्डन , व्यायाम शाळा , समाज मंदिर समोरील उर्वरित रस्त्याची कामे , हे सांगत ” डंपिंग ग्राउंड ” बद्दल योग्य नियोजन करण्याचे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिले .

            यावेळी विचार पिठावर राष्ट्रवादीचे नेते मधुकर भाऊ घारे , कर्जत तालुका अध्यक्ष दिपक श्रीखंडे, लाडीवली मा. सरपंच जगदीश भाई ठाकरे , राष्ट्रवादीचे युवा नेते योगेश आप्पा गायकवाड , अतुल कडू , आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन भाई भालेराव , माजी नगराध्यक्ष सुनंदा कांगणे , सीताराम कांगणे सर , वसंत मामा सुर्वे , गुंडगे नगरसेविका सौ हर्षाली उमेश गायकवाड , उद्योजक सुनील गायकवाड , पंकज पाटील , सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते . याप्रसंगी माथेरान वरून ज्युनिअर सिने कलाकार सलमान खान , अजय देवगण व इतर कलाकारांनी येवून आप्पांना शुभेच्छा दिल्या . यावेळी केक कापून ” विकास पुरुष उमेश आप्पा गायकवाड ” यांचा वाढदिवस साजरा करून अनेकांनी त्यांनी यशस्वी कार्यकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन बाळा सोनावणे यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!