…..” आशा सेविका भगिनींच्या आयुष्यातील निराशा दूर करून त्यांना एक भाऊ म्हणून ” सन्मान – सुरक्षितता आणि न्याय ” मिळवून देणार – आमदार महेंद्र शेठ थोरवे “……

” नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या ” निमित्ताने आशा सेविकांसह कर्जतमध्ये रक्षाबंधन साजरे !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
गावागावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत अत्यंत जबाबदारीने आणि निष्ठेने काम करणाऱ्या भगिनींनी आपल्या ” जीवाची पर्वा ” न करता कोविड काळात त्यांनी केलेली सेवा माझ्या मतदार संघात मी व सर्व समाज कधीही विसरणार नाही , असे गौरोद्गार ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी कर्जत तालुक्यातील ” आशा सेविका भगिनींच्या ” कार्याबद्दल ” नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या ” निमित्ताने आशा सेविकांसोबत रक्षाबंधन साजरे करत असताना काढले.

आशा सेविकांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन सर्व भगिनींना यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिले. आशा सेविकांना ” कायमस्वरूपी ” रुजू करून घेण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल , यासाठी प्रयत्न केले जातील. या अनुषंगाने आरोग्य विभागातील मंत्री, अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

माझ्या आशा सेविका भगिनींच्या आयुष्यातील ” निराशा ” दूर करून त्यांना ” सन्मान – सुरक्षितता आणि न्याय ” मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. एक ” भाऊ ” म्हणून तुमच्या पाठीशी सदैव ठामपणे उभा आहे, हा विश्वास यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिला.
याप्रसंगी कर्जत तालुक्यातील बहुसंख्य आशा सेविका भगिनी उपस्थित होत्या.



