…..” वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर हे देखील टोरेंट वीज प्रकल्प विरोधात मैदानात “…..
रविवारी ०१ नोव्हेंबर रोजी देणार भेट !

बहुसंख्येने सामील होण्याचे जिल्हा महासचिव ” धर्मेंद्र दादा मोरे ” यांचे आवाहन…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात पाली येथील साई डोंगर येथे होत असलेली बेसुमार अमानूष वृक्ष तोडीस व जीवघेण्या टोरेंट वीज प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आता बहुजनांचे नेते , वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ” बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर ” हे देखील या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी संतप्त होत ” मैदानात ” उतरले असून ते रविवार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी टोरेंट प्रकल्प स्थळी भेट देणार आहेत. या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन जिल्हा महासचिव तथा कर्जत तालुक्यातील बहुजन वर्गाचे झुंझार नेतृत्व ” धर्मेंद्र दादा मोरे ” यांनी केले आहे.

या प्रकल्पात हुकूमशाही , पर्यावरणाला हानी , येथील नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारा हा जीवघेणा प्रकल्प असल्याने येथील स्थानिकांनी याला कडाडून विरोध केला आहे. मात्र वरिष्ठ पातळी वरून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी येथील प्रशासन करत असल्याने विरोधाला न जुमानता हा प्रकल्प येथील सर्वांचाच ” श्वास ” हिरावून माथी लादण्याचा प्रयत्न चालू आहे.

स्थानिक पर्यावरण प्रेमी यांनी विरोध करून पेटवलेला हा ” वणवा ” आता महाराष्ट्रभर पसरला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , महाराष्ट्र नव निर्माण सेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , आर पी आय , आझाद समाज पार्टी , या पक्षांसहित मराठा संघाचे मनोज जरांगे पाटील , आगरी समाज , तसेच अनेक संघटनेने याला विरोध केला असून आता वंचित बहुजन आघाडीने देखील या विरोधात उडी घेऊन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा बहुजन नेते ॲड . प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे रविवारी येणार असल्याने टोरेंट वीज प्रकल्पाला विरोध दर्शविणार असल्याने त्यांच्या सोबत धर्मेंद्र मोरे – वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा महासचिव , तसेच तमाम बहुजन वर्ग देखील जमा होऊन टोरेंट वीज प्रकल्प स्थळी व साई डोंगर परिसरात जाणार असल्याने तणावाचे वातावरण पहाण्यास मिळणार आहे.




