टॉप न्यूज़

……” शिवसेना ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा , टोरेंट प्रकल्प साईडोंगर जंगलतोड काम पाडले बंद “……

उपजिल्हा प्रमुख ” नितीन दादा सावंत ” यांचा पुढाकार ! 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्व नागरिक सोने लुटत असताना कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरेंट वीज प्रकल्प परिसरात अनेक झाडांची कत्तल केल्यावर हि बातमी वाऱ्यासारखी पसरून खडबडून जागे झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ” उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत ” यांनी काल रविवार २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साईडोंगर पाली परिसरात असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने काम बंद पाडत आक्रमक भूमिका घेतली.

          पाली परिसरातील टोरेंट प्रकल्पासाठी चालू असलेल्या जंगलतोडीविरोधात आक्रमक भूमिका घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित निषेध मोर्चात सहभागी होऊन प्रत्यक्ष घटनास्थळी सुरू असलेल्या कामाला विरोध केला. निसर्गाचा ऱ्हास करणारी जंगलतोड थांबवण्याची ठाम भूमिका मांडत, यापुढे अशा प्रकारे पर्यावरणाची हानी होता कामा नये, असा स्पष्ट इशारा ” उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत ” यांनी संबंधितांना देण्यात आला.

          विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश आम्ही सहन करणार नाही. जंगल, पर्यावरण आणि पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आमचा संघर्ष कायम सुरू राहील , असे संतप्त मत ठाकरे सेनेचे ” उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत ” यांनी व्यक्त केले. 

          त्यामुळे ऐन दिवाळी जवळ येत असताना कर्जत तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून दिवसेंदिवस हे वातावरण अधिक गरम होणार असून आज सोमवारी ” युवा प्रमुख आदित्य ठाकरे ” हे अनेक नेत्यांना घेऊन या जंगलतोड विरोधात साई डोंगर परिसरात जाऊन टोरेंट वीज प्रकल्पाला आपला विरोध दर्शविणार आहेत , त्यामुळे याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!