दिल्ली NCR

…..” टोरेंट वृक्ष तोड प्रकरणी ठाकरे शिवसेना आक्रमक , २ नोव्हेंबर रोजी कर्जत तालुका बंद ची उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांची हाक “…….

जीवघेणा ” टोरेंट वीज प्रकल्प ” बंद करा……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील अनधिकृत व बेसुमार जंगलतोडीच्या निषेधार्थ , आपल्या सह्याद्रीच्या संरक्षणासाठी, निसर्गाच्या संवर्धनासाठी आणि कर्जतच्या उज्ज्वल भविष्यासाठी ” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ” पक्षाच्या वतीने ” उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत ” यांनी सोमवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी ” एकदिवसीय कर्जत तालुका बंद ” ची हाक दिली आहे. 

 

          कर्जत तालुक्यातील पाली साई डोंगर जंगल परिसरात टोरेंट वीज प्रकल्पासाठी आतापर्यंत २ हजारच्या वर विविध झाडे जमीनदोस्त केल्याने संपूर्ण कर्जत तालुक्यासहित महाराष्ट्रात या बेसुमार वृक्ष तोडीचा संताप व्यक्त होत आहे. विविध पक्षाचे व संघटनांचे प्रमुखांनी येथे येऊन या वृक्ष तोडीची पाहणी केली असून टोरेंट वीज प्रकल्पाला विरोध दर्शवित ” निषेध ” व्यक्त केला आहे.

          या प्रकल्पा विरोधात संपूर्ण कर्जत तालुका बंद ठेवून केंद्रातील तसेच राज्यातील फडणवीस सरकारचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष , संघटना , व्यापारी वर्ग , रिक्षा चालक मालक संघटना , भाजी विक्रेते , हॉटेल व्यावसायिक , हातगाडी युनियन , फेरीवाले यांना आवाहन करून स्वच्छेने या बंद मध्ये सामील होऊन संपूर्ण कर्जत तालुका सोमवार , २ नोव्हेंबर २०२६ रोजी ” सकाळ पासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ” आपली दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होऊन या टोरेंट प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवावा आणि सहकार्य करावे, अशी विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी करून ” जंगलतोड रोखूया – सह्याद्री वाचवू या ” , असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!