…..” कर्जत मधील उड्डाण पूल होण्याच्या प्रयत्नात ” पत्रकार बांधवांची ” महत्वाची भूमिका “…..

” व्हॉईस ऑफ मिडिया ” या कर्जत तालुका पत्रकार संघटनेचे मत !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत शहरात तसेच तालुक्यात होणाऱ्या नागरिकांच्या विकास कामांच्या अहंम भूमिकेत कर्जत मधील सर्वच ” पत्रकारांची ” खूप मोठी भूमिका असल्याचे दिसून येत आहे. कर्जत शहरात भेडसावणाऱ्या इतर समस्यांबरोबरच ” वाहतुकीची ” समस्या हि दिवसेंदिवस खूपच ” जटिल ” होत असताना नागरिकांना मरण यातना सहन कराव्या लागत होत्या . त्यामुळे याविरोधात उड्डाण पूल लवकरात लवकर व्हावे यासाठी वेळोवेळी सत्ताधारी राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांना , विरोधी पक्ष तसेच शासकीय अधिकाऱ्यांना याची जाणीव करून देण्याची महत्वाची भूमिका हे ” पत्रकार बांधव ” करत आले आहेत. त्यामुळे या मंजूर झालेल्या ” उड्डाण पुलात ” महत्वाची भूमिका हि ” पत्रकार बांधवांची ” असल्याचे मत ” व्हॉईस ऑफ मिडिया ” या पत्रकार संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष सुभाष सोनावणे यांनी व्यक्त केले आहे.

कर्जत तालुक्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या प्रथम वृत्तपत्राच्या , यू ट्यूब चॅनल , सोशल मीडियावर प्रसिद्ध व व्हायरल करण्याचे काम पत्रकार बांधव जो ” लोकशाहीचा चौथा स्तंभ ” तसेच ” जनतेचा आरसा ” म्हणून सत्ताधारी नेत्यांना , शासकीय अधिकाऱ्यांना दाखविण्याचे काम करत असतात. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवून समस्यांचे निराकरण करण्यास प्रवृत्त करतात. यामुळेच जनतेच्या मनातील विकासात्मक कामे होऊन सर्वांनाच मोकळा श्वास घेता यावा , म्हणून यामागे पत्रकार बांधवांची खूप मोठी भूमिका असते.
कर्जत मधील वाहतुकीची कोंडी फोडण्यास मंजूर झालेल्या उड्डाण पुलाच्या श्रेय वादाची जी लढाई सुरू आहे , या श्रेयवादात प्रथम भूमिका हि सर्वच पत्रकारांची असून त्यांनी जनतेच्या समस्यांची अडचण सर्वदूर पसरविण्यात महत्वाची बाजू मांडल्यानेच निर्णायक उत्तर आज मिळाले असल्याने , भविष्यात देखील अशीच विकास कामे होतील , असे मत ” व्हॉईस ऑफ मिडिया ” या पत्रकार संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष सुभाष सोनावणे यांनी व्यक्त केले आहे.




