दिल्ली NCR

……” गुंडगे गाव परिसरात व प्रभागात ” ATM ” सुविधेसाठी राष्ट्रवादीचे कर्जत शहर युवक कार्याध्यक्ष ” प्रणित सुरेश गायकवाड ” यांचे सर्व बँकांना निवेदन “…..

मा. उपनगराध्यक्ष उमेश आप्पा गायकवाड यांचा पुढाकार…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

गुंडगे गाव प्रभाग व परिसरात वाढती लोकसंख्या बघता व त्वरित पैसे काढण्यासाठी होणारी ” फरफट व पायपीट ” टाळण्यासाठी ” ATM ” सुविधा असावी , म्हणून राष्ट्रवादीचे कर्जत शहर युवक कार्याध्यक्ष ” प्रणित सुरेश गायकवाड ” यांनी मा. उपनगराध्यक्ष ” उमेश आप्पा गायकवाड ” यांच्या नेतृत्वाखाली व पुढाकाराने सर्व बँकांना निवेदन देऊन हि ATM सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

          गुंडगे-भिसेगाव परिसराची व आजूबाजूची गावे यांची एकंदरीत लोकसंख्या सुमारे १०,००० असूनही येथे एकही ATM सुविधा उपलब्ध नाही. पेट्रोल-CNG पंप, बस व रिक्षा स्टँड तसेच हाकेच्या अंतरावर कर्जत रेल्वे स्थानक जवळ असल्याने नागरिक, पर्यटक , प्रवासी व विद्यार्थ्यांना पैसे काढण्यासाठी कर्जत शहरात जावे लागते. तसेच स्थानिक व्यवसाय, सरकारी कार्यालय व हॉस्पिटलच्या दृष्टीनेही ATM सुविधा अत्यंत आवश्यक आहे.

            ही बाब उमेशआप्पा गायकवाड (मा. उपनगराध्यक्ष क.न.प) यांच्या निदर्शनास आल्यावर याबाबत त्यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीचे कर्जत शहर युवक कार्याध्यक्ष प्रणित सुरेश गायकवाड यांनी कर्जत शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र , बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, आय.सी. आय सी.आय बँक , एच.डी.एफ.सी बँक , बँक ऑफ बडोदा या सर्व बँकेच्या शाखा प्रबंधकाना लेखी निवेदन देण्यात आले. यासाठी काहीही सहकार्य लागेल , ते आम्ही करण्यास तयार आहोत , असे सांगण्यात आले आहे. 

            गुंडगे परिसरात लवकरात लवकर ATM मशीन सुविधा सुरू करण्यात यावे , अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बँकेच्या शाखा प्रबंधकांनी लवकरच ATM मशीन सुविधा सुरू करण्याचे आश्वासन , याप्रसंगी दिले असल्याचे प्रणित सुरेश गायकवाड – युवक कार्याध्यक्ष, कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!