दिल्ली NCR

…..” मुसळधार पावसात आपत्तीत मदत करताना जीव गमावणाऱ्या ” अमन शफिक मुजावर ” यांच्या कुटुंबाला खालापूर महसूल प्रशासनाचा आधार “…..

" चार लाखांचा " सानुग्रह धनादेश सुपूर्द !

आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या सहित खालापूर तहसीलदार , भाई शिंदे , नगराध्यक्ष शेंडे व इतर मान्यवर उपस्थित……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

अतिवृष्टी दरम्यान नागरिकांच्या मदतकार्यात सहभागी होत असताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या ” अमन शफिक मुजावर ” यांच्या कुटुंबाला महसूल प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून शासनाच्या वतीने ” चार लाख ” रुपयांचा ” सानुग्रह धनादेश ” प्रदान केला. आपत्तीमध्ये जीव गमावलेल्या समाजाभिमुख युवकाच्या कुटुंबाला वेळेत आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी खालापूर महसूल प्रशासनाने केलेल्या तत्पर कार्यवाहीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

         खालापूर तालुक्यातील शिळफाटा येथील रहिवासी ” अमन शफिक मुजावर ” यांनी ०६ जुलै २०२६ रोजी खोपोली परिसरात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान नागरिकांच्या मदतकार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता. खोपोलीजवळील सायमाळ परिसरात मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर झाड व दरड कोसळल्याने निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य सुरू असताना झाडाची फांदी अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले व उपचारा दरम्यान त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

         या घटनेनंतर महसूल प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, पडताळणी आणि शासनस्तरावरील कार्यवाही जलदगतीने पूर्ण केली. त्यानुसार अमन मुजावर यांच्या कुटुंबाला शासनाकडून मंजूर झालेल्या ” चार लाख ” रुपयांचा सानुग्रह सहाय्याचा धनादेश आज सुपूर्द करण्यात आला. यावेळी कर्जत–खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे, खालापूरचे तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खालापूर पंचायत समितीचे सदस्य रघुनाथ तथा भाई शिंदे , खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे तसेच विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

           याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अमन मुजावर यांच्या सेवाभावी वृत्तीला अभिवादन करत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या युवकाच्या कुटुंबाच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचा संदेश या मदतीतून देण्यात आला. आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या ” स्वयंसेवकांच्या ” योगदानाची शासनाकडून दखल घेतली जात असल्याचे या कार्यवाहीतून अधोरेखित झाले असून, संवेदनशील व तत्पर प्रशासनामुळे दु:खाच्या प्रसंगी पीडित कुटुंबाला वेळेत आर्थिक आधार मिळाल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!