दिल्ली NCR

…..” नगरसेवक असावा तर असा , नागरिकांच्या समस्या सोडविण्यात नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल , दोन पाऊले पुढे “…….

कर्जत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना घेऊन " प्रभाग क्रमांक ६ " मधील समस्यांची केली पाहणी !

लवकरच सर्व कामे मार्गी लावणार ” नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल ” यांचा विश्वास…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषद मध्ये गेली ३ महिन्यांपासून नगरसेवक झाल्यापासून आपल्या ६ नंबर प्रभागामध्ये नागरिकांच्या समस्या सोडविण्यात व प्रभागाचा विकास करण्यात कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेनेचे युवा नेतृत्व नगरसेवक ॲड संकेत भासे यांच्या सहकार्याने सर्वांत ” दोन पाऊले ” पुढे असलेले ” कर्तबगार नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल ” यांचा हात कुणी धरू शकत नाही. महावीर पेठ , बाजारपेठ , मटण – मच्छी मार्केट व श्री धापया महाराज मंदिर परिसरातील नागरिकांची कधी कुणी समस्या सोडविल्या नसतील अश्या किचकट स्वच्छता व आरोग्य समस्या त्याचप्रमाणे आलेल्या पावसाळ्यापूर्वीची कामे नागरिकांनी सांगताच पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी दौरा करून तातडीने या समस्या सोडवा , असे सांगून या प्रभागातील नागरिकांची ” वाहवा ” मिळवली आहे . ” नगरसेवक असावा तर ॲड . रोहित ओसवाल यांच्यासारखा तडफेने काम करणारा ” , अशी चर्चा सध्या या प्रभागात होत आहे. 

           सोमवार दि. २२ जून २०२६ रोजी शिवसेनेचे नगरसेवक ॲड. रोहित राजेंद्र ओसवाल यांनी तातडीने नगर रचना अधिकारी – पवार सर , आरोग्य अधिकारी – रायन सर व पाणी पुरवठा अधिकारी – अभिमन्यू सर यांना बोलवून प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांच्या ज्या समस्या होत्या ते प्रत्यक्ष दाखवून त्वरित काम करून घेण्यास सांगितले. श्री धापया मंदिर परिसर, पाटील आळी परिसर , मच्छी मार्केट परिसर व बाजार पेठेत या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत समस्यांची व नागरिकांच्या तक्रारींची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली , यामध्ये

१) श्री.धापया महाराज मंदिर परिसर येथील पावसाळ्यात कायम पाणी साठून राहतं त्या साठी उपयोजना त्वरित करण्यासाठी सांगितले.

२) मटण – मच्छी मार्केट येथील सार्वजनिक शौचालय लवकर डागडुजी करणे व नगरपालिका कडून नळ कनेक्शन देणे.

३) ज्या ज्या परिसरात गटार अजून साफ झालेले नाही , ते करणे , तसेच पाण्याचा निचरा होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरणार नाही म्हणून असा परिसर त्वरित साफ सफाई करून घेणे. ४) महावीर पेठ व बाजारपेठ येथील राहिलेले खड्डे व मधील पट्टे डांबरीकरण करणे. आदी कामांचा समावेश आहे .

           या समस्या ” प्रभाग क्रमांक ६ ” मधील नागरिकांनी ” नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल ” यांना सांगितल्या असता तातडीने पालिका अधिकाऱ्यांना घेऊन या सर्व समस्येची पाहणी करून त्या लवकरात लवकर व तातडीने सोडवण्यात येतील , असा विश्वास नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल यांनी नागरिकांना दिला आहे . विशेष म्हणजे या प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांपेक्षा शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल यांच्या काम करण्याच्या चढाईने त्यांच्यावर प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांनी ” कौतुकाचा वर्षाव ” केला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!