दिल्ली NCR

……” नेरळ – ममदापूर येथे रेहान जाकर पालटे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन “……

शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित !

हे केवळ पक्ष कार्यालय नसून जनतेच्या समस्यांचे उत्तर शोधून देणारे सेवा केंद्र – आमदार महेंद्र शेठ थोरवे 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

नेहमीच शिवसेना पक्ष , ” शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ” यांच्या ” ८०% समाजकारण व २०% राजकारण ” या ब्रीद वाक्यावर चालत असून समाजसेवेचा वसा जपण्याचा नेहमीच प्रयत्न करते . कर्जत तालुक्यातील नेरळ – ममदापूर भागात जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नुकतेच ” रेहान जाकर पालटे ” यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या शुभहस्ते व शिवसेना पदाधिकारी , मान्यवर , तसेच शिवसैनिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले .

         पक्ष संघटना वाढीसाठी हे नवे कार्यालय महत्वपूर्ण ठरणार असून मात्र शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय केवळ पक्ष कार्यालय नसून जनतेच्या समस्यांचे उत्तर शोधून देणारे सेवा केंद्र असेल , याच पद्धतीने या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत जपले जाईल हा विश्वास या प्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. ममदापूर मधील जनतेच्या सर्व समस्या या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवल्या जातील , असे आश्वासन देखील त्यांनी दिले . तर रेहान हा माझा अत्यंत विश्वासू कार्यकर्ता आहे, सामाजिक जाणीव असलेल्या रेहान यांस पुढील वाटचालीस शुभेच्छा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिल्या.

          याप्रसंगी युवासेना कर्जत तालुका प्रमुख अमर मिसाळ यांनी देखील रेहानच्या कार्याचे कौतुक करत पक्षवाढीसाठी अधिक चांगले काम करण्यास सदिच्छा व्यक्त केल्या.

            याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत प्रसाद मनोहर थोरवे ( जिल्हाप्रमुख युवा सेना), अमर मिसाळ (युवा सेना तालुकाप्रमुख), सुभाष मिनमीने (उपतालुका संघटक), जुबेर पालटे, मुदस्सर पालटे, अक्रम तिवाले, बाबुराव शिनारे, रोहित कराळे, मुबा नजे, अली नजे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेहान यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!