दिल्ली NCR

……” अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणास कर्जत तालुका आर पी आय पक्षाचा कडाडून विरोध “……

कर्जत तहसीलदार " धनंजय जाधव " व पोलीस निरीक्षक " उमेश पाटील " यांना दिले निवेदन !

जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा राज्य सरकारचा डाव – कर्जत ता. अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

भारतीय घटनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजाने अनेक वर्षांच्या संघर्षातून घटनात्मक हक्क व आरक्षण मिळविले आहे. अशा परिस्थितीत अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा कोणताही निर्णय समाजामध्ये मतभेद निर्माण करणारा, सामाजिक ऐक्यावर परिणाम करणारा आणि अनुसूचित जातींच्या एकात्मतेला बाधा आणणारा ठरू शकतो अशी भूमिका घेणाऱ्या राज्य शासनाचे जातीजातीत तेढ निर्माण करणारा डाव असल्याचे संतप्त मत व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी कर्जत तहसीलदार धनंजय जाधव व कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना निवेदन दिले व हे निवेदन राज्य सरकारकडे पाठविण्याची मागणी केली .

        भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय तसेच समानतेची हमी देण्यात आली आहे. तसेच अनुच्छेद १४ (कायद्यापुढे समानता), अनुच्छेद १५(४) व १५(५) (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतुदी), अनुच्छेद १६(४) (मागास वर्गासाठी आरक्षण), अनुच्छेद १७ (अस्पृश्यतेचे उच्चाटन), अनुच्छेद ४६ (अनुसूचित जाती-जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण) आणि अनुच्छेद ३४१ (अनुसूचित जातींची अधिसूचना) या तरतुदी अनुसूचित जातींच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहेत. राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाने वरील अनुच्छेदास बाधा येऊ शकते . म्हणूनच महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये.

         अनुसूचित जातींसाठीची विद्यमान आरक्षण व्यवस्था कायम ठेवावी. अनुसूचित जातींच्या घटनात्मक हक्कांचे आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे संरक्षण करावे. अनुसूचित जातींच्या हितास बाधा आणणारा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित समाजघटक, तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांशी व्यापक चर्चा करावी. अश्या मागणीचे निवेदन आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले .

          सदर निवेदन देताना आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या समवेत यावेळी मालु निरगुडा – आदिवासी समाज रायगड जिल्हा अध्यक्ष , किशोर गायकवाड – कर्जत तालुका संपर्कप्रमुख , अशोक गायकवाड – कर्जत तालुका सचिव , प्रेमनाथ जाधव – आर पी आय कर्जत तालुका प्रवक्ते , ॲड. उदय जाधव – कर्जत शहर अध्यक्ष, आर पी आय कर्जत तालुका महिला अध्यक्षा अलका सोनावणे , बबन गायकवाड – भारतीय बौद्ध महासभा कर्जत तालुका अध्यक्ष , हरिश्चंद्र जाधव सर – सामाजिक कार्यकर्ते , संजय जाधव – भारतीय बौद्ध महासभा कार्यकर्ते , मारुती चव्हाण – सरपंच कोंडीवडे , कोमल चंदनशिवे – मा. शहराध्यक्ष नेरळ , रवींद्र जाधव – नेरळ शहर अध्यक्ष , प्रवीण गायकवाड – आरपीआय कार्यकर्ता , उज्वला सोनावणे – आरपीआय कार्यकर्ते , संदीप गायकवाड – आरपीआय कार्यकर्ते , त्याचप्रमाणे मयूर गायकवाड, विशाल गायकवाड, अतुल सोनावणे, सुमित गायकवाड , मुकेश आढाव , विजय गायकवाड ( कर्जत तालुका प्रसिद्धीप्रमुख आरपीआय ) व अनेक आंबेडकरी अनुयायी , बहुजन समाजाचे मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!