दिल्ली NCR

……” कर्तबगार कर्जत रेल्वे पोलीस व होमगार्ड जवानांची उल्लेखनीय कामगिरी “……

लोकल मध्ये सापडलेली काळया रंगाची बॅग केली परत !

काळूराम कानू मोहिते , यांनी २९५०० रु. परत मिळाल्याने ” रेल्वे पोलीस व होमगार्ड ” यांचे मानले आभार……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत रेल्वे पोलीस व होमगार्ड जवानांनी पुन्हा एकदा प्रामाणिकपणाचे दर्शन घडवून आपले कर्तव्य बजावले आहे . कर्जत रेल्वे स्थानकावर पोहवा/ 1306 एकनाथ कोळी हे शुक्रवार दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी दिवसपाळी ड्युटी कर्जत रेल्वे स्टेशनवर सकाळी ०९ .०० ते रात्री २१.०० वाजेपर्यंत सोबत महिला होमगार्ड/1069 विद्या भालेराव , महिला होमगार्ड/1136 पूजा पेडणकर, यांच्या सह कर्जत रेल्वे स्थानकावर गस्त करीत कर्तव्य बजावत असताना सुमारे १६.०० वाजता च्या दरम्यान आलेल्या लोकलमध्ये बेवारस काळया रंगाची सॅक बॅग मिळाली . मात्र या बॅग जवळ कुणीच नसल्याने त्यांनी ती बॅग कुणाची आहे ? हे तपासले असता त्यामध्ये एक छोटी डायरी होती , त्यावर नाव संजय जोशी मोबाईल क्रमांक 9869569611 असे होते , त्यावर लागलीच कॉल लावून पासबुक वर नाव काळू राम कानू मोहिते असे सांगितले . यांना आपण ओळखता का ? असे विचारले असता , त्यांनी सांगितले की , ते माझे नातेवाईक आहेत .

          यावर त्यांना कर्जत रेल्वे पोलीस ठाणे येथे बोलावले असता ठाणे अंमलदार विजय एडके यांच्या समक्ष शहानिशा केली असता , त्यांचे नाव काळूराम कानू मोहिते, वय ८४ वर्षे धंदा पेन्शनर , राहणार रूम ३०३ अभय राज अपार्टमेंट , शिवाजी चौक – गवळीवाडा बदलापूर (पूर्व ) मोबाईल क्रमांक 8796092033 , अशी पूर्ण खात्री करून खालील प्रमाणे रुपये मिळाले. 1) 500 × 40 = 20000, 2) 100 × 95 = 9500, असे Total = 29500/- रूपये काळया रंगाची बॅग, बॅगेत पाणी बॉटल, बदलापूर पोस्ट ऑफिस चे दोन पासबुक, औषधे व इतर वस्तू प्रमाणित पणे त्यांच्या ताब्यात दिले.

          आपली हरवलेली बॅग व त्यामधील पैसे व महत्वाची कागदपत्रे पुन्हा मिळाल्याने त्यांनी कर्जत लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले , तर कर्तबगार कामगिरी केल्याबद्दल रेल्वे पोलीस व होमगार्ड जवानांचे कौतुक किरण मतकर – वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!