दिल्ली NCR

…..” म्हणतात सारे , जन सामान्यांचा भक्कम आधार ” नगरसेवक विजय भाऊ हजारे “…..

नगरसेवक म्हणून भिसेगाव प्रभागातील अनेक ” समस्या ” व्हिजन – २ मध्ये लावणार मार्गी……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

आपल्या हसतमुख व सौजन्यपूर्ण सहवासाने आपलेसे करणारे , तर अनेकांना आधार देत त्यांच्या समस्या सोडविण्यात नेहमीच झटणारे कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील नगरसेवक ” विजू भाऊ किसन हजारे ” हे असामान्य व्यक्तिमत्व आहे .

         सन २००४ साली विजयाचा ” झेंडा ” डौलाने फडकावत भिसेगाव प्रभागातील नागरिक माझा ” परिवार ” असल्याने अनेक विकास कामे करून आपल्या कार्याने आजही सर्वांच्याच लक्षात राहिलेले , सर्वांचे ” लाडके ” , तरुणाईचे ” आधारस्तंभ ” विजय भाऊ हजारे ” व्हिजन – २ ” मध्ये कर्जत नगर परिषद निवडणूक – २०२५ महायुतीतील शिवसेना पक्षाकडून उमेदवारी घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊन निवडून आले आहेत.   

       त्यांच्या मदत कार्यामुळे कर्जत तालुक्यासहित रायगड जिल्ह्यात , मुंबई – पुणे , नवी मुंबई , वाशी , सारख्या महानगरात त्यांचा दांडगा जनसंपर्क , तरुणाईचा असलेला पाठिंबा , मोठ्या प्रमाणात आहे . ते अनेक संघटनेत कार्यरत आहेत.

         ” विजय भाऊ हजारे ” सुशिक्षित – उच्चशिक्षित चेहरा आहे . सन २००४ साली मोठ्या मताधिक्याने ते भिसेगाव प्रभागात निवडून आले होते , आणि त्यांनी येथील त्यांच्या परिवारातील सदस्य असलेल्या जनतेसाठी पाणी , शौचालय , गटारे , स्वच्छता , वीज , रस्ते , यांसारखी कामे करून समस्या सोडविल्या होत्या . आता बहुसंख्येने वाढलेल्या भिसेगाव नागरिक व त्यांच्या समस्या ” व्हिजन – २ ” मध्ये सोडविण्यास पुन्हा एकदा निवडून येऊन नगरसेवक झाले आहेत . कुणीही – कधीही संपर्क केल्यास तातडीने त्यांची समस्या मार्गी लावण्याचे ” कसब ” त्यांच्याकडे आहे . कुणी एक कॉल करावा , व पुढच्याच क्षणी त्याची समस्या सुटलेली असते , असा विजू भाऊ यांची काम करण्याची स्टाईल आहे. 

          त्यांना लहानपनापासूनच क्रिकेट , व्यायाम , या खेळाची आवड असल्याने त्यांची शरीरयष्टी भरदार आहे. निर्व्यसनी राहून त्यांनी तरुणांना कुठलेच व्यसन करू नका , शरीर हिच संपत्ती आहे , असा प्रेरणादायी संदेश ते देत असतात. 

          कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या खास मर्जीतील असलेले नगरसेवक ” विजू भाऊ हजारे ” त्यांच्या नेतृत्वाखाली अहोरात्र मदतीचा हात देत आहेत. आजपर्यंत त्यांच्या या महान कार्यात त्यांच्या आईंचा ” आशीर्वाद ” , भाऊ स्वर्गीय प्रकाश भाई यांची ” शिकवण ” तर सावली सारखी ” साथ ” देणारी त्यांची पत्नी , तर खांद्याला खांदा लावून त्यांच्या मदत कार्यात वाहून घेतलेला त्यांचा मुलगा ” निखिल ” , कुटुंबातील व नातेवाईकांची सर्वांची सोबत असल्यानेच माझ्याकडून हे कार्य होते , असे ते नेहमीच सांगत असतात . 

         आज बुधवार दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी नगरसेवक विजू भाऊ हजारे जन्म दिवस असल्याने त्यांच्या हातून अधिक कार्य घडो , त्यांचे आरोग्य निरोगी राहो , त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होवो , हिच ईश्वर चरणी प्रार्थना व त्यांना खूप खूप शुभेच्छा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!