दिल्ली NCR

……” कर्जतमध्ये गॅस समस्येबाबत ठाकरे सेनेच्या महिला रणरागिणींच्या आक्रोशाची दखल , आत्ता गॅस मिळणार २५ दिवसांत “……

" गणेशोत्सवात " महिला वर्गाला मोठा दिलासा !

” भारत गॅस ” कर्जत – खारघर कार्यालयाचे हालिवली मा. सरपंच ” सौ. प्रमिला बोराडे ” यांनी मानले आभार…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जतमध्ये भारत गॅस सिलेंडर एजन्सी मध्ये सर्वांना ” ४५ ” दिवसांनी घरगुती गॅस मिळत होता. त्यामुळे महिलांना घरातील जेवण व इतर गॅस वर कामे करताना अनंत अडचणी येत होत्या. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ रणरागिणी हालिवली ग्रामपंचायतीच्या मा. सरपंच सौ. ” प्रमिला सुरेश बोराडे ” यांच्या नेतृत्वाखाली या विरोधात महिला आघाडी संतप्त होत १८ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन देत ४५ दिवसांत मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर तात्काळ २५ दिवसांत मिळावा , अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा दिला होता. या प्रकरणी नुकताच भारत गॅसच्या कर्जत – खारघर कार्यालय व पेट्रोलियम मंत्रालयाने आता ” २५ ” दिवसांत घरगुती गॅस सिलेंडर मिळणार असे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे सणावारात महिला वर्गाला खूप मोठा ” दिलासा ” मिळाला आहे.

           गेली आठ महिने कर्जत तालुक्यात ४५ दिवसांनी भारत गॅस सिलेंडर मिळत असल्याच्या गंभीर समस्ये विरोधात हालिवली मा. सरपंच सौ. प्रमिला बोराडे , मा.सदस्य दर्शना बोराडे, प्रमिला दिनकर, मंदा हाडप , करुणा बोराडे, वर्षा उबाळे, प्रतिभा बारणे यांनी भारत गॅस कर्जत ऑफिस तसेच कर्जत तहसीलदार यांना सिलेंडर गॅस ची ४५ दिवसांची मुदत कमी करण्यात यावी , गॅस संपल्यास त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा. याबाबत निवेदन देण्यात आले होते. यावेळी भारत गॅस कर्जत ऑफिस येथील कुलकर्णी मॅडम यांनी अतिशय सहकार्याची भूमिका दाखवून खारघर येथील भारत गॅस ऑफिसच्या मॅनेजर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी कंपनीने हा विषय गांभीर्याने घेतला असून कंपनीची मीटिंग झाल्यावर तुम्हाला निर्णायक माहिती कळविण्यात येईल , असे सांगितले होते.

         जर लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर याविरोधात मा. सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे, हालिवली महिला मंडळ व कर्जत तालुक्यातील सर्व महिला एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल व वेळ पडल्यास उपोषण करण्यात येईल ,असे खारघर ऑफिस तसेच कर्जत ऑफिस येथे सांगण्यात आले होते. 

          या आंदोलनाला कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका सौ.सुचिता खोत – सभापती पाणीपुरवठा समिती , तालुकाप्रमुख करूणा बडेकर व ठाकरे शिवसेना कर्जत तालुका महिला आघाडी, माजी नगरसेविका बिनिता घुमरे, विमल दिसले व भिसेगाव महिला मंडळ , सकळ मराठा जिजाऊ च्या लेकी ग्रुप , हालिवली महिला कट्टा तसेच तालुक्यातील अनेक महिलांनी फोन करून व प्रत्यक्ष भेटून या आंदोलनास पाठिंबा दिला होता.  

       या इशाऱ्याची गंभीर दखल घेत कंपनीची तातडीची मीटिंग बोलवण्यात आली असून त्यामध्ये पुढील अटी मान्य करण्यात आल्या आहेत. आधी दोन सिलेंडर बुकींग मधील अंतर ४५ दिवसांचे होते , आता ते अंतर २५ दिवसांचे करण्यात आले आहे. शहरी व ग्रामीण दोन्हींसाठी २५ दिवसांचा नियम लागू करण्यात आला आहे.

         महिलांच्या या कौटुंबिक गंभीर समस्या बाबत हालिवली ग्रामपंचायतीच्या मा. सरपंच सौ.प्रमिला बोराडे व त्यांच्या महिला मंडळाने तालुक्यातुन प्रथमच आवाज उठविल्यामुळे हा आवाज भारत गॅसच्या कर्जत – खारघर येथील कार्यालयामधून थेट पेट्रोलियम मंत्रालयापर्यंत पोहोचला. त्यामुळेच कंपनीची तातडीची मीटिंग होऊन या मीटिंगमध्ये महिलांच्या आक्रोशाची तत्परतेने दखल घेण्यात आली व गणेशोत्सव सणावाराच्या काळात योग्य दखल घेतल्याने ” भारत गॅस कर्मचारी , मॅनेजर , संचालक मंडळ यांचे सर्व महिला वर्गाच्या वतीने हालिवली ग्रामपंचायतीच्या मा सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!