……” पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते कर्जतमध्ये ” पोलीस वाहतूक मित्र ” म्हणून सेवा बजावणाऱ्यांचा ” जीवनदूत ” या पुरस्काराने सन्मान “…….

” सामाजिक बांधिलकी व समाजाचे देणे आहोत “, या भावनेतून सेवा – ” जीवनदूत ” विकास दादा चित्ते…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात भेडसावणारी वाहतूक कोंडी फोडण्याकामी महत्त्वाची कामगिरी गेल्या १ वर्षांपासून सुरुवात करून देशव्यापी कार्य करणाऱ्या सेवकांचा नुकताच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ” मान. नामदार भरत शेठ गोगावले ” यांच्या हस्ते अलिबाग येथे ” जीवनदूत ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
यामध्ये कुमार गोखले , प्रविण कालेकर (बाळा), अमिर मनियार, महेंद्र कर्वे ,सतिश मुसळे , शिवनाथ कारखेले जय मल्हार टोईंग व्हॅन व ऍम्ब्युलन्स सेवा व विकास दादा चित्ते यांचा समावेश आहे. या प्रसंगी सुनिल चव्हाण – पोलीस उपनिरीक्षक , रुपेश नागेश – हेड कॉन्स्टेबल व विशाल आव्हाड उपस्थित होते.

यावेळी रायगड जिल्हा पालकमंत्री श्री. भरत शेठ गोगावले, ( मंत्री रोजगार हमी योजना, फलोत्पादन , खारभुमी विकास ) , श्रीमती. ऑंचल दलाल – पोलीस अधीक्षक रायगड , श्री. किशन जावळे – जिल्हाधिकारी रायगड , श्रीमती नेहा भोसले – मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड व अभिजित शिवतारे – अप्पर पोलीस अधीक्षक यांचे हस्ते हा भव्य सन्मान करणेत आला.

कर्जत मध्ये प्रचंड वाहतूक समस्या निर्माण झाल्याने पोलीस वाहतूक मित्र म्हणून ग्रुप तयार करणेत आला. या ग्रुप च्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे काम सामाजिक बांधिलकी व समाजाचे देणे लागतो या भावनेतून सुरु करण्यात आले. साधारण एक वर्षापासून हे काम ” पोलीस वाहतूक मित्र ” या ग्रुप च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या कामी नागरिकांचे उत्तम सहकार्य मिळत आहे. या सत्काराबद्दल त्यांचेवर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा समस्त कर्जतकरांचा सन्मान आहे , उप विभागीय पोलिस अधिकारी श्री. राहुल गायकवाड साहेब, कर्जत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. उमेश पाटील साहेब, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक श्री. सुनील चव्हाण साहेब, हेड कॉन्स्टेबल श्री. रुपेश नागेश व सहकारी कर्मचारी यांचे मार्गदर्शन व कर्जत तालुक्यातील नागरिकांनी केलेले सहकार्य यामुळेच हे शक्य झाले. सहकारी पोलिस वाहतूक मित्र , पत्रकार बांधव यांचा या सन्मानामध्ये सिंहाचा वाटा आहे , असे भावनिक मत ” जीवनदूत विकास दादा चित्ते ” यांनी व्यक्त केले.





