दिल्ली NCR

…..” आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या दैदित्यमान विकास कार्यात नव्या श्रीराम पुलाच्या लोकार्पणाची भर “……

इन्फ्रास्ट्रक्चर विकासकामांमुळे कर्जतमध्ये " पर्यटकांची " होणार वाढ !

आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या विशेष प्रयत्नातून कर्जत मधील ” वाहतूक कोंडी ” अखेर सुटणार……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

गेल्या ३ वर्षांपूर्वी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन झालेल्या व वाहतुकी कोंडीवर ” रामबाण उपाय ” असलेला कर्जत शहरातील ” श्रीराम पुलाचे ” आज शनिवार दिनांक ०४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्याचे ” रोजगार हमी योजना व फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले , मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे , कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या शुभहस्ते शिवसेना – भाजप पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्जतकर नागरिकांच्या उपस्थितीत आज ” लोकार्पण ” करण्यात आले .

       

             कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या या श्रीराम पुलाचे आज झालेल्या लोकार्पणामुळे कर्जत मधील वाहतूक कोंडी कायमची दूर होणार आहे . ६ कोटी ३० लाख रुपयांचा बांधण्यात आलेल्या या श्रीराम पुलामुळे व इतर इन्फ्रास्ट्रक्चर विकासकामांमुळे कर्जतमध्ये पर्यटकांची अधिक वाढ होणार असल्याचा विश्वास तर ” भूमिपूजन व लोकार्पण ” आमच्या हस्ते झाल्याचा आनंद देखील यावेळी उद्घाटन सोहळ्यात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केला .

        तर येणाऱ्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री पदाची शपथ घेऊन आमच्या शुभहस्ते झेंडावंदन होणार , असे मत ” मंत्री भरत शेठ गोगावले ” यांनी व्यक्त केले . आम्ही शिवसेनेचे प्रमुख तथा उप मुख्यमंत्री ” एकनाथजी शिंदे साहेब ” यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून ” सबुरीका फल मिठा होता है ” लवकरच ते फळ मिळेल , अशीच कामे महेंद्र शेठ तुम्ही करत रहा , ” आगे आगे देखो होता है क्या ” तुम्ही विकासाच्या जोरावर ” तिसऱ्यांदा आमदार ” व्हाल , असा आशीर्वाद मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना दिला , व आजपासून कर्जत तालुक्यातील वाहतुक कोंडीचा ” वनवास ” संपून हा ” श्रीराम पुल ” खुला करण्यात आल्याचे जाहीर केले . यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सुद्धा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विकास कार्याचे कौतुक केले . 

          याप्रसंगी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख भाई गायकर , खालापूरचे उप सभापती भाई शिंदे , जिल्हा संघटक पाटील , माथेरान नगराध्यक्ष चौधरी , खोपोली नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे , युवा नेते विश्वनाथ थोरवे , जिल्हा संघटक संभाजी शेठ जगताप , कर्जत ता. प्रमुख सुदाम दादा पवाळी , विधानसभा संघटक शिवराम बदे , सोमने , देशमुख , मते , नगरसेवक ॲड संकेत दादा भासे, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर प्रमुख संजय मोहिते , शहर संघटक नदीम भाई खान , संघटक दिनेश कडू , शहर संघटिका शहासने , उप शहर प्रमुख मोहन भोईर , शहर संघटक नारायण जुनघरे , सचिन खंडागळे , भाजपचे जिल्हा महासचिव दिपक बेहरे , जिल्हा सचिव रमेश मुंढे , जिल्हा नेते तानाजी चव्हाण , मा. नगराध्यक्ष शरद भाऊ लाड , राजेश भगत , खोपोली बांधकाम सभापती अनिल सानप , मा. नगरसेवक औसरमल , माजी राजिप समाज कल्याण सभापती सुभाष दादा गवळे , शिवसेना कर्जत नगरसेवक विजय भाऊ हजारे , नगरसेविका अरुणा वायकर , नगरसेविका जान्हवी देवघरे , नगरसेविका कोयल कन्हेरीकर ,नगरसेवक रामदास गायकवाड , नगरसेवक वैभव सुरावकर , नगरसेवक किशोर कदम , सनी चव्हाण , अजय शेठ पाल , त्याचप्रमाणे कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसेना – भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते , महिला आघाडी , युवा सेना पदाधिकारी त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते . याप्रसंगी कर्जत पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला होता .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!