…..” संघर्षातून घडलेला लोकनेता , पालकमंत्री ” भरत शेठ गोगावले ” यांचा २ सप्टेंबर रोजी ” शिवतीर्थ ” पोसरी येथे भव्य सन्मानसोहळा “…..
कर्जतमध्ये " शिवसेनेत " उत्साहाचे वातावरण !

या सन्मान सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांचे आवाहन…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
राजकारणात संयम – निष्ठा – लोकांप्रती काम करण्याची प्रबळ ईच्छा हा ” त्रिवेणी संगम ” रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री मान. ” श्री. भरत शेठ गोगावले ” यांच्यात दिसून येतो. अनेक संघर्षानंतर व मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी होऊनही शांत रहात आपले कार्य त्यांनी सुरूच ठेवले , व अखेर नियतीने विरोधकांना देखील झुकवले. व रायगडकरांच्या ” हक्काचा पालकमंत्री ” अखेर विराजमान झाला. या लोकनेत्याचा ” सन्मान सोहळा ” बुधवार, दि. ०२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पोसरी – कर्जत येथे ” शिवतीर्थ सभागृहात ” मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.

रायगडचा शिवसेनेचा हा ” ढाण्या वाघ, गोर गरिबांचा लोकनेता, भरत शेठ गोगावले ” महाड पोलादपूर मतदार संघातून गेली ” चार ” दशके राजकारणात आहेत. महाड येथील ” बिरवाडी ” गाव येथून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य २ वेळा व, सभापती, चार वेळा आमदार, मंत्री व आता पालकमंत्री, असा त्यांचा यशस्वी राजकीय प्रवास आहे. एक ” डॅशिंग शिवसैनिक ते पालकमंत्री ” हा त्यांचा प्रवास खूपच संघर्षमय आहे. शांत राहून तडका फडकी निर्णय घेणे, हा त्यांचा काम करण्याचा राजकीय स्वभाव असल्याने , आलेल्या सर्वांनाच ते मदत करून आपलेसे करतात. आजपर्यंत त्यांनी हजारो करोडो रुपयांची विकास कामे करून आपल्या मतदार संघात ” विकासाची गंगा ” आणली आहे. अनेक तरुणांना रोजगार, धंदे दिल्याने ” तरुण शक्ती ” त्यांच्या पाठीशी ठाम आहे.

त्यांना मिळालेल्या पालकमंत्री पदामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण असून शिवसैनिकांत नवचैतन्य आले आहे. हा क्षण शिवसैनिकांसाठी अभिमानाचा आणि भावनिक समाधानाचा असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कर्जत – खालापूर मतदार संघात कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या साथीने हा भव्य सन्मान सोहळा संपन्न होण्यासाठी सर्व सज्ज झाले आहेत. पोसरी – कर्जत येथे ” शिवतीर्थ सभागृहात ” होणाऱ्या या सन्मान सोहळ्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे , अलिबागचे आमदार महेंद्र दळवी प्रमुख पाहुणे उपस्थित रहाणार आहेत.
या भव्य सन्मान सोहळ्यास कर्जत विधानसभा मतदारसंघातील शिवसेना – युवा सेना – महिला आघाडी – शिवसैनिक , पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व निमंत्रण कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केले आहे.




