…..” कार्यासी तत्पर शोभेल – नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल “…….
मुख्य बाजारपेठ व महावीर पेठ, कर्जत येथील विजेचे टेन्शन गुल !

630 KVA क्षमतेच्या नवीन ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या हस्ते उत्साहात संपन्न……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कुठलीही समस्या असो , त्यावर पाठपुरावा करून ती समस्या मुळा पासूनच दूर करणे , हा कार्यतत्पर नगरसेवक ” ॲड रोहित राजेंद्र ओसवाल ” यांचा हातखंडा आता सर्वदूर पसरत चालला आहे. आपल्या प्रभागाबरोबरच कर्जत शहरात विकास कार्य करून ” समाजसेवक ” म्हणून गौरवास्पद शाबासकी मिळवून ” शिवसेना पक्ष व कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचे नाव यानिमित्ताने ” रोशन ” करत असल्याचे चित्र ॲड रोहित ओसवाल आपल्या कृतीतून दिसत आहे.

आपल्या कर्जत शहरातील ” मुख्य बाजारपेठ व महावीर पेठ ” परिसरातील नागरिक आणि व्यापारी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर महत्त्वपूर्ण तोडगा निघाला आहे. ” समस्या आमची पण साथ खंबीर नेतृत्वाची ” असे महत्त्वपूर्ण काम आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मदतीने नगरसेवक ॲड रोहित ओसवाल यांनी येथे जास्त क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा गटनेते ॲड संकेत दादा भासे यांना सांगून अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. या गंभीर समस्यांची दखल आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी घेऊन 630 KVA क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर या विभागात बसविण्यात आला. यामुळे परिसरातील नागरिक व व्यापारी बांधवांना कमी दाबाच्या वीज पुरवठ्याच्या समस्येतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

या 630 KVA क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर ” लोकार्पण सोहळा ” शुक्रवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी शनी मंदिर येथे मान. आमदार श्री. महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी गटनेते व नगरसेवक ॲड. संकेतजी भासे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. “ व्यापारी हा शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे ” असे मत व्यक्त करत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी या कामासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून २४ लाख ५७ हजार रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला आहे. या प्रश्नासाठी नगरसेवक रोहित ओसवाल सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे व व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत वर्क ऑर्डर नसताना देखील हे काम जलद गतीने पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले. व्यापार वाढला, तर रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि शहराच्या विकासाला गती मिळते. त्यामुळे व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवून त्यांना आवश्यक मूलभूत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांची सुबत्ता वाढावी आणि त्यांना व्यवसाय करताना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहे,” व्यापाऱ्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी यापुढेही आवश्यक उपाययोजना करण्याचा प्रयत्न राहील, अशी भूमिका आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी याप्रसंगी मांडली.

याप्रसंगी भाजपा उत्तर रायगड सरचिटणीस दीपक बेहेरे, शिवसेना गटनेते संकेत दादा भासे, माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक वैभव सुरावकर, नगरसेविका सौ. जान्हवी देवघरे , नगरसेविका सौ. अरुणा गायकर , नगरसेवक विजय हजारे, नगरसेवक रामदास गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख अभिषेक सुर्वे, शहरप्रमुख संजय मोहिते, शहर संघटक नदीम भाई खान , उपशहरप्रमुख दिनेश कडू, ज्येष्ठ शिवसैनिक मोहन शेठ ओसवाल, शहर संघटक नारायण जुनघरे , व्यापारी स्वप्नील जैन, शिवलाल गुप्ता, मुस्तफा अजगर अली, गुजराती समाज अध्यक्ष उदय पटेल, अमित ओसवाल , सुक्कु वाघेला आदींसह व्यापारी व स्थानिक नागरिक , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, दिलेला शब्द पूर्ण करण्याची बांधिलकी आणि विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले ” ॲड. रोहित ओसवाल ” तर मोठ्या धैर्याने त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून मदतीचा हात देणारे कर्तृत्ववान – कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या या कार्याचे सर्वांनीच मनःपूर्वक आभार व्यक्त केले.




