…..” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा राष्ट्रवादीला जोर का झटका “…….
खालापूर तालुक्यातील " देवन्हावे " ग्रामपंचायत परिसरात " शिवसेनेने " घेतली राजकीय मुसंडी !

” सौ.अनन्या अखिल साखरे ” ( ग्रामपंचायत सदस्या, देवन्हावे ) यांच्यासह ” अखिल साखरे ” यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी खालापूर तालुका आपला लक्ष केला असून आज ” बाळासाहेब भवन ” कर्जत येथे राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ” जोर का झटका ” दिला आहे . खालापूर तालुक्यातील देवन्हावे ग्रामपंचायत परिसरात शिवसेनेने पुन्हा एकदा मोठी राजकीय मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि कर्जत-खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या ” विकास पुरुष ” नेतृत्वावर आणि नागरिकांच्या हिताच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला आहे. 
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात सौ.अनन्या अखिल साखरे (ग्रामपंचायत सदस्या, देवन्हावे ) यांच्यासह श्री. अखिल साखरे, सौ. संगीता जयदीप महाडीक, सौ. निर्मला चंद्रकांत तळोजकर, सौ. लता गजानन जाधव, सौ. सुनिता अंकुश वाघमारे, सौ. चंदा यशवंत वाघमारे, सौ. मंदा शंकर वाघमारे, सौ. मनिषा गोरक्षनाथ वाघमोरे, सौ. शोभा गोविंदवाड, सौ. कमल प्रदीप पांढरे, सौ. सुरेखा वाघमारे, सौ. स्वप्नाली सतीश पाटील, सौ. गंगु अंकुश वाघमारे, सौ. निशा वसंत पवार, सौ. समृद्धी सुमीत टेकले, सौ. ऋतुजा जयेश तांबडे, सौ. पूजा दारुणकर, सौ. राणी जयेश पालंडे, सौ. रिद्धी मच्छिंद्र टेकले, सौ. अनीता नितीन भाटकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांचे हात मजबूत केले आहेत , तर या प्रवेशाने शिवसेनेचा ” भगवा ” देवन्हावे भागात ” डौलाने ” फडकत आहे .

यावेळी कर्जत खालापूर मतदार संघात नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या ” नेतृत्वावर ” आमचा विश्वास असल्यानेच हा पक्ष प्रवेश केला असल्याचे सौ. अनन्या अखिल साखरे (ग्रामपंचायत सदस्या, देवन्हावे ) यांनी मत व्यक्त केले आहे . प्रवेश करणाऱ्या सौ. अनन्या साखरे या राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांच्या कुटुंबातील त्यांच्या वहिणी व अखिल साखरे हे भाऊ असल्याने त्यांच्या या शिवसेनेत केलेल्या पक्ष प्रवेशामुळे सर्वांचेच लक्ष लागून आहे .

याप्रसंगी कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





