…..” दर्शन खामगावकर दोस्तीच्या दुनियेतील दिलदार मनाचा दिलदार राजा “……
" युवा उद्योजक " म्हणून त्यांची झालेली " प्रगती " नक्कीच युवा पिढीला प्रेरणादायी !

त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव सारख्या प्रगतशील गावात अतिशय मेहनत करून ” टुर्स अँड ट्रॅव्हल्स ” सारख्या क्षेत्रात उदयास येत असलेला ” युवा उद्योजक ” तर ” दोस्तीच्या दुनियेतील दिलदार मनाचा दिलदार राजा ” दर्शन खामगावकर याच्याकडे बघितले जाते . हलाखीच्या परिस्थितीवर मात करत त्यांची झालेली प्रगती नक्कीच युवा पिढीला प्रेरणादायी असून सलग १८ तास काम करून त्याच्या मेहनतीचे हे फळ आहे , हे म्हणणे वावगे ठरणार नाही .

वडील विष्णू खामगावकर ” पॅपको कंपनी ” खोपोली येथे कामास होते . घराचा भार त्यांच्यावर असताना दर्शनने १० वी पर्यंत शिक्षण घेतले . त्यांची आई तुळसाबाई विष्णू खामगावकर अतिशय कष्टाळू व प्रेमळ असल्याने घराची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली . वडिलांचं छत्र हरविल्यावर दर्शनने अनेक ठिकाणी काम करून घराला आधार दिला.

भरदार शरीरयष्टी , व्यायामाची सवय , मातीतील खेळ खेळण्याची आवड , त्यामुळे अनेक तरुण त्यांचे मित्र आहेत . मोटार ड्रायव्हिंग शिकून त्याने काही वर्षे काम केले . शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा कर्जत तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व ” भाई गायकर ” यांचे देखील काही महिने ते सारथी होते . अखेर त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले , आज जवळ जवळ नऊ वर्षे झाले ते सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत येथे ” वाहन चालक ” म्हणून कार्यरत आहेत.
त्यांना ड्रायव्हिंग हे क्षेत्र आवडत असल्याने टूर्स अँड ट्रॅव्हल्स या क्षेत्रात त्यांनी उडी घेऊन ” युवा उद्योजक ” म्हणून उदयास येत आहेत . भविष्यात अजून भरारी घेण्यासाठी त्यांची मेहनत नक्कीच फळास येईल , हि शाश्वती वाटते . त्यांच्या या यशस्वी कार्यकिर्दीस त्यांची मातोश्री तुळसाबाई विष्णू खामगावकर यांचे आशीर्वाद व पत्नी सौ. प्रियांका तसेच मुली कु. वैदेही , कु . पार्थवी दर्शन खामगावकर यांची सावली सारखी साथ असते . ते म्हणतात न , एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका ” स्त्री ” ची शक्ती असते , अगदी तसेच . सोमवार दिनांक २७ जुलै २०२६ रोजी त्यांच्या जन्म दिवसानिमित्त त्यांच्या गगन भरारी घेणाऱ्या पंखांना अजून बळ मिळावे , व ते अधिक यशस्वी होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात , हिच त्यांना शुभेच्छा , व ईश्वर चरणी प्रार्थना !




