दिल्ली NCR

……” शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि ग्रामस्थांच्या अस्तित्वासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची देधडक – बेधडक ठाम भूमिका “……

शिलार व पोशीर धरण प्रकल्प रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

” मी कालही शेतकऱ्यांच्या पाठीशी होतो, आजही आहे आणि भविष्यातही त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ठामपणे उभा राहीन “…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

ज्या प्रस्तावित ” शिलार व पोशीर ” धरणांमुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे, शेती व्यवसाय तसेच अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे , असे जन जीवन उध्वस्त करणारे माझ्या मतदार संघात शिलार व पोशीर असे दोन्ही धरणे होऊन देणार नाही , अशी देधडक – बेधडक ठाम भूमिका स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांचा तीव्र विरोध असल्याने सदर प्रकल्प रद्द करण्याची मागणी येथील कर्तृत्ववान नेतृत्व कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांना पत्र देऊन केली आहे.

 

            कर्जत तालुक्यातील येऊ घातलेले शिलार व पोशीर या धरण प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे, शेती व्यवसाय तसेच अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

         या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांच्या वतीने आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याकडे प्राप्त झालेल्या निवेदनांची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे यांना पत्राद्वारे सदर दोन्ही धरण प्रकल्प रद्द करण्याबाबत शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

          विकासाच्या नावाखाली स्थानिक शेतकऱ्यांचे अस्तित्व, त्यांच्या जमिनी आणि भावी पिढ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये, ही त्यांची ठाम भूमिका आहे. तर लोकप्रतिनिधी या नात्याने स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांच्या भावना आणि मागण्यांचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे. ” मी कालही शेतकऱ्यांच्या पाठीशी होतो, आजही आहे आणि भविष्यातही त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ठामपणे उभा राहीन “, शेतकऱ्यांचा सन्मान, ग्रामस्थांच्या हक्कांचे संरक्षण आणि जनतेच्या भावनांना प्राधान्य, हीच माझी भूमिका , नेहमीच राहील , असे मत आमदार महेंद्र शेठ सदाशिव थोरवे यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!