……” टोरेंट – टाटा पॉवर – शिलार – पोशीर हे सर्व धरण प्रकल्प पर्यावरणाचा नाश करून नियमबाह्य पद्धतीने लादलेले , ” भाजप किसान मोर्चाचा ” कडाडून विरोध “……

प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी घेतली हरकत !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात येऊ घातलेले ” टोरेंट – टाटा पॉवर – शिलार – पोशीर हे सर्व धरणे प्रकल्प पर्यावरणाचा नाश करून नियमबाह्य पद्धतीने लादलेले असल्याने , भाजप किसान मोर्चाने यास कडाडून विरोध करत प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी या सर्व प्रकल्पांवर हरकत नोंदवली आहे.
या प्रकल्पांबाबतीत पश्चिम घाटाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये अधिसूचना काढून नियमात बदल करून आपल्यावर हे अन्यायकारक प्रकल्प लादण्याचा प्रयत्न होत आहे . त्यासाठी किसान मोर्चा च्या वतीने आणि स्वतः याला कडून विरोध करत असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी सांगितले आहे. हे अन्यायकारक प्रकल्प सर्व पक्षीय , सर्व संघटनांना विश्वासात घेऊन न होण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रित येऊन विरोध करणे , असे त्यांचे ठाम मत आहे , म्हणूनच त्यांनी हरकत नोंदवून आपला विरोध दर्शवला आहे.
२७ जुलै २०२६ रोजी केंद्र शासनाने पश्चिम घाट आणि पर्यावरण नियमावली बदल करण्यासाठी सात राज्यातील विविध पर्वत रांगातील गावे डिफाइन केली आहेत . त्यावरती सूचना आणि हरकती ” ६० दिवसात ” घेण्याचे आहेत. म्हणूनच मी हरकत नोंदवलेली असून इतर सर्वांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या बदलास हरकती घेतल्यास टोरेंट किंवा इतर आपल्या इथे होऊ घातलेले ” विनाशकारी धरण प्रकल्प ” बंदी आणता येतील , म्हणूनच सर्व बाधित गावातील नागरिकांनी , शेतकरी बांधवांनी हरकती आणि सुचनांचा मेल करावा , जेणेकरून आपल्यावर अन्यायकारक प्रकल्प लादण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला आळा बसेल , असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी केले आहे.




