…..” कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्या व दलित वस्त्यांमध्ये सोळाव्या वित्त आयोगाच्या निधीतून विकास करा , “आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड ” यांची मागणी “……
" मूलभूत नागरी सुविधांची " कमतरता असल्याने अनेक अडचणी !

” कर्जत गटविकास अधिकारी पाटील व विस्तार अधिकारी ” यांना दिले निवेदन……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग आहे . अनेक आदिवासी वाड्या व दलित वस्त्यां असलेल्या कर्जत तालुक्यात अनेक मूलभूत गरजा अद्यापि पोहचल्या नसल्याने अनेक अडचणींना गोर गरीब नागरिकांना सामोरे जावे लागत आहे . यासाठी या भागातील ” विकास ” व्हावा म्हणून ” सोळाव्या वित्त आयोगाच्या ” निधीतून विकास करा , अशी प्रमुख मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पाटील व विस्तार अधिकारी यांना मंगळवार दिनांक १४ जुलै २०२६ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे .
कर्जत तालुक्यात सुमारे ५५ ग्रामपंचायती असून त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक आदिवासी वाड्या, पाडे तसेच दलित वस्त्या आहेत. या वाड्या – वस्त्यांमध्ये आजही चांगले सिमेंट काँक्रीटचे रस्ते नाहीत , पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी , सांडपाणी व्यवस्थापन , गटारे , रस्ते दिवे , स्वच्छता तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांची कमतरता आहे . त्यामुळे तेथील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .
अगोदरच तब्बल २ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समितीच्या निवडणुका उशिराने झाल्याने येथील विकास कामे थांबलेली असल्याने सोई सुविधा झाली नाहीत . त्यामुळे नागरिकांना अनेक मूलभूत गरजा नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी येत असून त्वरीत सोळाव्या वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन करताना अशा वंचित व गरजू वाड्या-वस्त्यांना प्राधान्य देण्यात यावे , ग्रामपंचायतींच्या मार्फत आवश्यक सर्वेक्षण करून स्थानिक गरजेनुसार १६ व्या वित्त आयोगाच्या विकास आराखड्यास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा. यामुळे आदिवासी व दलित वस्त्यांमधील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होतील आणि सर्वसमावेशक ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल .
म्हणूनच या मागणीचा गांभीर्याने व सकारात्मक विचार करून कर्जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवश्यक सूचना देऊन आदिवासी व दलित वाड्या-वस्त्यांमध्ये प्राधान्याने विकासकामे हाती घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना केली आहे .




