टॉप न्यूज़

…..” भिसेगाव सटू आई नगरात दरड कोसळल्याने केलेल्या मदतीचे जाधव व दिसले कुटुंबीयांनी नगराध्यक्षा , नगरसेवक व इतरांचे मानले आभार “……

हि मदत म्हणजे " राजकारण " विरहित कार्य !

नगराध्यक्षा ” सौ. पुष्पाताई दगडे , सभापती हर्षाली गायकवाड , मानसी कानिटकर , अशोक दादा राऊत ” यांची उल्लेखनीय कामगिरी…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

मुसळधार पावसामुळे कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील सटू आई परिसरात डोंगर भागाच्या खाली रहात असलेल्या ” चेतन जाधव (बंटी ) व राहुल दिसले ” यांच्या घरांवर दरड कोसळून घरांचे नुकसान झाले होते . सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घटनेची माहिती मिळताच कर्जत नगरपरिषदेच्या कार्यतत्पर नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे , महिला व बाल कल्याण सभापती हर्षाली उमेश गायकवाड , नगरसेवक अशोक दादा राऊत , नगरसेविका मानसी कानिटकर , महेंद्र कानिटकर व इतर भिसेगाव ग्रामस्थ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली , तर रात्री माहिती मिळताच भिसेगाव नगरसेवक विजू भाऊ हजारे यांनी देखील उपस्थिती दर्शवली . परिस्थितीची पाहणी करून त्यांनी केलेली मदत हि राजकारण विरहित माणुसकीची असल्याने जाधव व दिसले कुटुंबीयांनी सर्वांचेच आभार व्यक्त केले आहेत.

           रविवार दिनांक ५ जुलै च्या संध्याकाळी ते ७ जुलै २०२६ पर्यंत सातत्याने नगराध्यक्षा सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे यांच्या सहित नगरसेवक अशोक दादा राऊत, नगरसेविका सौ. मानसी कानिटकर , बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सौ. हर्षाली उमेश गायकवाड , महेंद्र कानिटकर , नदीम भाई खान हे सतत ३ दिवस घटनास्थळी उपस्थित राहून जाधव व दिसले कुटुंबीयांना त्यांनी मदत व धीर दिला , येथील पाहणी करून सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सांगितले , तर महेंद्र कानिटकर यांनी स्वखर्चाने जेसीबी आणून कोसळलेल्या दरडी तील मोठमोठे दगड , माती बाजूला करून सर्व पूर्ववत करून दिले. 

          नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत , प्रशासना मार्फत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून , आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवून , राजकारण विरहित कार्य करणाऱ्या कर्जत नगरीच्या नगराध्यक्षा ” सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे ” उप नगराध्यक्ष संतोष दादा पाटील व सर्व नगरसेवकांचे तसेच मोहन भोईर , माजी नगरसेवक सोमनाथ आप्पा ठोंबरे , राकेश देशमुख , पोलिस पाटील संजय हजारे व इतर भिसेगाव ग्रामस्थांचे या उल्लेखनीय मदत कार्याबद्दल जाधव व दिसले कुटुंबीयांनी सर्वांचेच आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!