टॉप न्यूज़

……” पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी सुनील गोगटे यांचे पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न “…….

खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस " विनोदजी तावडे साहेब " यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट !

सकारात्मक मार्ग काढण्याचे खासदार ” विनोदजी तावडे ” यांचे आश्वासन…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

रायगड जिल्ह्याबरोबरच कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या ” जिव्हाळ्याचा प्रश्न ” असलेला तर अनेकांचे सुखी जीवन ” उध्वस्त ” करणाऱ्या ” पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ” ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी गेली अनेक वर्षे केंद्रीय पातळीवर प्रयत्न करणारे कर्जत मधील भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ” सुनील गोगटे ” यांनी पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून यावेळी त्यांनी त्यांचे मार्गदर्शक नेते, खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस ” मा. श्री. विनोदजी तावडे साहेब ” यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन कर्जत तालुक्यातील विविध विकासकामे व जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली , तसेच रायगड जिल्ह्यातील पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांचा अत्यंत ज्वलंत प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

         रायगड जिल्ह्यातील पेण को-ऑपरेटिव्ह बँक बंद पडल्यामुळे हजारो ठेवीदारांचे कष्टाचे पैसे अडकले आहेत. केंद्र सरकारने २०२० मध्ये लागू केलेल्या कायद्यानुसार ठेवीदारांना ₹5 लाखांपर्यंतच्या ठेव रक्कमेचे विमा संरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय सहकार मंत्री ” अमितजी शहा ” यांच्याकडे आपल्या माध्यमातून प्रभावी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती यावेळी सुनील गोगटे यांनी मा. तावडे साहेबांना केली.

         यावर खासदार मा. तावडे साहेबांनी लवकरच ” अमितभाई शाह ” यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

            अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला खासदार विनोदजी तावडे यांचा प्रवास भाजपचे विविध पदे , आमदार, शिक्षणमंत्री, विविध खात्यांचे मंत्री, खासदार आणि आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. सर्वसामान्यांच्या भावना आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर ” सकारात्मक मार्ग ” काढण्याची त्यांची कार्यपद्धती सुनील गोगटे यांनी जवळून अनुभवली असल्याने मला पूर्ण विश्वास आहे की मा. विनोदजी तावडे साहेब या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालून पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील , असे प्रांजळ मत यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी व्यक्त केले .

          त्यांच्या या आश्वासनामुळे खूप मोठा दिलासा मिळाला असून आशेचा किरण दिसला असल्याने मा. तावडे साहेबांचे गोगटे यांनी मनःपूर्वक आभार मानले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!