टॉप न्यूज़

…..” भिसेगाव येथे मित्राच्या घरावर दरड कोसळली , शिवसेनेचा मावळा नदीम भाई खान धावला मदतीला “……

" चेतन जाधव (बंटी ) व राहुल दिसले " यांच्या घरांचे नुकसान !

पाहिजे ती मदत करा , ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचे ” नदीम भाई खान ” यांना निर्देश…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

गेली पाच दिवसांपासून कर्जत तालुक्यात वारा आणि मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे . कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील सटू आई नगरात डोंगरावरची दरड कोसळल्याने येथे राहणाऱ्या ” चेतन जाधव (बंटी ) व राहुल दिसले ” यांच्या घरांचे नुकसान झाल्याचे समजतात , शिवसेनेचे कर्जत शहर संघटक , शिवसेनेचा कट्टर मावळा ” नदीम भाई खान ” आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तातडीने भिसेगाव येथे येऊन यंत्रणा हलवून मदतीचे कार्य सुरू केल्याने आपल्या मित्राला चेतन जाधव (बंटी ) यांस धीर देत परिस्थिती व्यवस्थित हाताळली . याची कल्पना आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना दिल्याने , ” पाहिजे ती मदत करा ” , असे निर्देश त्यांनी दिल्याने कोसळलेली दरड , माती , दूर करण्यास तातडीची मदत मिळाली .

          रविवार दिनांक ०५ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत होता . सायंकाळी ७ च्या दरम्यान बंटी जाधव घरात असताना त्यांना जोराचा आवाज आला , म्हणून ते घराच्या मागील दरवाज्याकडे आले असता डोंगरावरून माती आणि दगडांचा ढिगारा खाली कोसळला असल्याचे त्यांना दिसले . घरावर दरड कोसळल्याने घरांचे खूप नुकसान झाले व घरात सगळीकडे चिखलाचा खताडा झाल्याने गोंधळलेल्या बंटी म्हणजे चेतन जाधव याने मदतीसाठी आपला मित्र शिवसेनेचा मावळा नदीम भाई खान यांना कॉल करून सविस्तर वृत्त सांगितले . लागलीच नदीम भाई काही सहकारी घेऊन त्यांच्या घराकडे भिसेगाव येथे पोहोचले . त्यांनी परिस्थितीत बघितली आणि कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पुष्पा ताई दगडे यांना कॉल केला . तोवर भिसेगाव ग्रामस्थ सदर घटनेच्या ठिकाणी पोहचले होते . शिवसेना नगरसेवक विजय भाऊ हजारे , उपशहर प्रमुख मोहन भोईर , माजी नगरसेवक सोमनाथ आप्पा ठोंबरे , राकेश देशमुख , विशाल बैलमारे , पोलिस पाटील संजय हजारे व इतर ग्रामस्थ आले . तर नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे , घटना स्थळी आल्यावर पाहणी करून नगर पालिका प्रशासनाने घर खाली करून बाहेर झोपण्यासाठी रॉयल गार्डन मध्ये नियोजन केले . मात्र नदीम भाई यांनी चेतन जाधव यांच्या सर्व कुटुंबाला आपल्या घरी राहण्याची व्यवस्था केली .

          दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता सदर ठिकाणी तहसीलदार धनंजय जाधव , मुख्याधिकारी तानाजी चव्हाण , उप नगराध्यक्ष संतोष दादा पाटील , यांनी देखील येवून पाहणी केली . पाऊस असल्याने काम करता न आल्याने ७ तारखेला नदीम भाई खान यांनी यंत्रणा हलवून जे सी बी च्या साहाय्याने सर्व दगड माती काढून परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला . यावेळी शिवसेनेचे नगरसेवक ॲड. संकेत दादा भासे यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन जी काही मदत लागली तर त्वरित कळवा , मी ते पाठवतो , असे सांगितले .

         नेहमीच राजकारण न करता राजकारण विरहित व कुठलीच जात – पात न बघता सर्व धर्म समभावाची भावना ठेवून ” माणुसकी धर्म ” बघून कार्य करणारे शिवसेना कर्जत शहर संघटक ” शिवभक्त नदीम भाई खान ” यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या निर्देशानुसार आपला मित्र चेतन जाधव (बंटी ) व राहुल दिसले यांच्या कुटुंबावर व घरांवर आलेल्या संकटाला मदत करून दूर केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!