टॉप न्यूज़

…..” गुरू – शिष्यातील नात्यांच्या पवित्र दिनी शिवसेना कर्जत शहर संघटक नदीम भाई खान आपल्या गुरुंप्रती नतमस्तक “……

सर्व कर्जत कर नागरिकांना दिल्या महेंद्र गडावरून " गुरु पौर्णिमेच्या " शुभेच्छा !

सदैव जनतेच्या मनात राहून ” जनसेवक ” म्हणून कार्य करेन , नदीम भाई खान यांची ग्वाही……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

भारतीय संस्कृतीत ” गुरु – शिष्य ” परंपरेचा पवित्र उत्सव म्हणजे ” गुरु पौर्णिमा “. जिथे गुरु हे केवळ ज्ञानदाता नसून, संस्कार – विवेक आणि जीवनाला योग्य दिशा देणारे ” दीपस्तंभ ” मानले जातात. प्रथम हे सुंदर जग दाखविणारे जन्म दाते माता – पिता , विद्या दान देणारे विद्यासागर शिक्षक , तर जीवनात बोट पकडून जीवनाचे महत्व शिकविणारे मार्गदाता हे गुरू स्थानी असल्याने नेहमीच नतमस्तक होऊन ” आशीर्वाद ” रुपी पुढील दिवसांची शिदोरी घेणारे कर्जत मधील ” शिवभक्त तथा शिवसेना कर्जत शहर संघटक नदीम भाई युसुफ खान ” यांनी आज बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ रोजी आपले माता – पिता , विद्या देणारे शिक्षक तर जीवनाचे सार सांगणारे कर्जत मधील सर्व सामान्य जनतेचे नायक स्वर्गीय अनंत काका जोशी , गरजवंतांना मदत केल्याने पुण्य वाढते , हे सांगणारे उपजिल्हा प्रमुख – दानवीर व्यक्तिमत्व भाई गायकर , धगधगत्या अग्निकुंडातून शिवसेना पक्षाचे ज्वलंत विचार देणारे ” शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ” व त्यांच्या राजकीय क्षेत्रात सुवर्ण झळाळी देणारे , संघर्षातून फिनिक्स पक्षा प्रमाणे गगनभेदी – गरुड भरारी घेणारे , कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट – विकास पुरुष ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांना त्यांच्या प्रगल्भ विचारांना नमन करून या पवित्र दिनी भारतीय संस्कृतीतील या महान गुरु-शिष्य परंपरेचा गौरव जपत, आपल्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरुंचे आशीर्वाद घेतले.

            आपण जे पण आज आहोत या गुरुंच्या उच्च प्रेरणेमुळे असून त्यांचे विचार , त्यांचे कार्य बनून माझ्या आयुष्यात उतरविण्याचा मी अल्पसा प्रयत्न करत असतो , असे नेहमीच शिवभक्त तथा शिवसेना कर्जत शहर संघटक ” नदीम भाई खान ” सांगत असतात . गोर गरीब – गरजू नागरिकांना रोटी – कपडा , आरोग्य , शैक्षणिक साहित्य , अन्नदान , करून वैद्यकीय – रक्तदान शिबिरे , घेत असतात. पोलीस ठाण्यात संकटकाळी नागरिकांच्या समस्या सोडविणे , तहसील कार्यालयात मदत करणे , अपघात समयी अंग मेहनत घेऊन जीवदान देणे , अशी विविध सेवाभावी कामे करण्यास ” प्रेरणा ” त्यांना या गुरूंमुळेच मिळते , असे मत ते व्यक्त करतात. 

           राजकीय क्षेत्रात त्यांनी लहानपणापासून कर्जतचा ” ढान्या वाघ अनंत काका जोशी ” यांच्या सानिध्यात राहून , ” शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ” यांचे प्रगल्भ विचार ऐकून ” शिवसेना ” या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली , व आज ते कर्जत शहर संघटक म्हणून कार्यसम्राट ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत .

          आजच्या या पवित्र दिनी सदैव जनतेच्या मनात राहून ” जनसेवक ” म्हणून कार्य करेन , अशी ग्वाही देत , ” नदीम भाई खान ” यांनी आपल्या कर्जत हद्दीत साई नगर प्रभागातील संपर्क कार्यालय ” महेंद्र गडा ” वरून सर्व कर्जतकर नागरिकांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!