……” पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने इनोव्हेटिव्ह ग्रुप ऑफ कॉलेजचा स्तुत्य उपक्रम “…….
" वृक्षारोपण महायज्ञ - २०२६ " अंतर्गत व्यापक वृक्षारोपण अभियान संपन्न !

ग्रेटर नोएडा येथे ” डॉ. मृत्युंजय पांडे ” विधी विभागाचे प्राचार्य यांचा पुढाकार……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
शासनाच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग (विभाग–05) च्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ” वृक्षारोपण महायज्ञ – २०२६ ” अंतर्गत आज ” इनोव्हेटिव्ह ग्रुप ऑफ कॉलेज “, ग्रेटर नोएडा येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण, जैवविविधता वाढवणे, हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देणे आणि समाजात हरित जाणीव निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

यावेळी या कार्यक्रमाचे शुभारंभ महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ” श्री. देवाशीष गौड ” यांच्या हस्ते रोपटे लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी उपस्थित शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वृक्ष लावण्याची आणि त्यांचे संगोपन करण्याची शपथ दिली. याप्रसंगी ते म्हणाले, ” झाडे केवळ पर्यावरणाचा समतोल राखत नाहीत, तर मानव जीवन, पशु-पक्षी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याचा पायाही आहेत.” तर डॉ. मृत्युंजय पांडे , विधी विभागाचे प्राचार्य म्हणाले की भारतीय संस्कृतीत वृक्षांना नेहमीच पूजनीय स्थान आहे. पर्यावरण आणि वनांचे रक्षण करणे , हे राज्य आणि प्रत्येक नागरिकाचे घटनात्मक कर्तव्य आहे . प्रा. सौरभ सारस्वत – फार्मसी विभाग म्हणाले की , स्वच्छ पर्यावरण हेच निरोगी समाजाचा पाया आहे . झाडे हवा शुद्ध करतात आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. प्रा. दीपशिखा दुबे आणि डॉ. अन्नू बहल यांनी वृक्षारोपणाला जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी वाढवण्याचे आवाहन केले.

यावेळी महाविद्यालय परिसरात सावली देणारी, फळे देणारी आणि औषधी अशा विविध जातींची रोपे लावण्यात आली. लावलेल्या रोपांच्या संगोपनासाठी पाणी आणि सुरक्षेची स्वतंत्र योजना देखील तयार करण्यात आली. सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर कमी करणे, जलसंवर्धन करणे आणि अधिकाधिक वृक्ष लावण्याचा सामूहिक संकल्प केला. श्री. देवाशीष गौड यांनी सांगितले की, वृक्षारोपण महायज्ञ हा केवळ सरकारी कार्यक्रम नाही, तर लोकसहभागाचा अभियान आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यात किमान एक झाड लावावे आणि ते मोठे वृक्ष होईपर्यंत त्याची काळजी घ्यावी.

कार्यक्रमाची सांगता पर्यावरण संरक्षण आणि वृक्षांच्या सुरक्षेची शपथ घेऊन झाली. इनोव्हेटिव्ह ग्रुप ऑफ कॉलेज भविष्यातही शासनाच्या पर्यावरण, जलसंवर्धन आणि स्वच्छता अभियानांमध्ये सक्रिय सहभाग नेहमीच घेत राहणार , असा विश्वास या वृक्षारोपण कार्यक्रमातून दाखविण्यात आले .




