…..” कर्जत तालुक्यात पळसदरी येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळली “……
घरांचे व वाहनांचे नुकसान !

आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी केली पाहणी व अधिकाऱ्यांना दिले मदतीचे निर्देश…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
सततधार ४ दिवस कर्जत तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्या ओसंडून वाहत आहेत . पूरसदृश्य परिस्थिती ओढवली असून पळसदरी आदिवासी वाडी येथे डोंगराची दरड आज सकाळी कोसळली असून अनेक घरांचे व वाहनांचे नुकसान झाले आहे . त्यामुळे ही माहिती मिळताच लागलीच येथे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी या भागाची पाहणी करून आदिवासी बांधवांना धीर देत अधिकारी वर्गाला मदतीचे निर्देश दिले आहेत .

पळसदरी आदिवासी वाडी ही डोंगरा लागत असल्याने मुसळधार पावसामुळे गावाच्या शेजारील असलेली दरड पाण्यामुळे खिळखिळी होऊन कोसळली आहे . डोंगराखाली असलेल्या घरांचे व दोन – चार चाकी वाहन मातीखाली आल्याने नुकसान झाले आहे . सुदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नसून एक घर पडण्याच्या स्थितीत आहे .
आपल्या आदिवासी बांधवांच्या घरांवर दरड कोसळली ही माहिती मिळताच आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी लागलीच या भागाची पाहणी करून आदिवासी बांधवांना धीर दिला .




