दिल्ली NCR

…..” राणाप्रताप मित्र मंडळ मोठे वेणगांव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न “……

" कै.प्रितेश हरिश्चंद्र शिंदे " यांच्या स्मरणार्थ (९ वे) वर्षात रक्तदानात अनेकांचा सहभाग !

३३ रक्तदात्यांनी केले ” देशव्यापी ” कार्य……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे ” राणाप्रताप मित्र मंडळ – मोठे वेणगांव ” यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कै.प्रितेश हरिश्चंद्र शिंदे यांच्या स्मरणार्थ नुकतेच संपन्न झाले. सलग (९ वे) वर्षात या देशव्यापी रक्तदान कार्यात अनेकांनी सहभाग घेतला. 

           समर्पण रक्त केंद्र घाटकोपर यांच्या सहकार्याने कर्जत- खालापुर तालुक्यातील रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर यांच्या पुढाकाराने आयोजित ” ५४४ ” व्या रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत विठ्ठल मंदिर,मोठे वेणगांव, ता. कर्जत, जि.रायगड येथे आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी एकूण 33 रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय, सामाजिक व मानवतावादी कार्य करुन सहकार्य केले.

               याप्रसंगी राणाप्रताप मित्र मंडळाचे अध्यक्ष जितेश आंब्रे , उपाध्यक्ष वैभव सावंत , प्रशांत शिंदे , मंदार सावंत , कैलास शिंदे , हरीश जाधव , नितीन गवसकर , मनोज सावंत , किशोर शिंदे , समीर शिंदे , जयवंत केलटकर व रुपेश चव्हाण उपस्थित होते , तसेच जयवंत म्हसे , डॉ.प्रशांत सदावर्ते, प्रशांत उगले व पत्रकार प्रशांत खराडे आदी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहुन रक्तदात्यांचे मनोधैर्य वाढविले.

              या रक्तदान शिबिरात रक्त संकलनाचे काम घाटकोपर येथील ” समर्पण रक्तकेंद्र ” यांचे डॉ.रमेश सिंघ , अनिता सिस्टर , शिला वाघमारे , प्रदीप नितोरे , दिपेश सरदार , लक्ष्मणकाका नाईक व इतर आरोग्य सेवकांनी उत्तम पद्धतीने केले. 

 

              हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राणाप्रताप मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले . या देशव्यापी रक्तदान शिबिरात सहभाग घेणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार राणाप्रताप मित्र मंडळाचे पदाधिकारी व महारक्तवीर तथा नगरसेवक राजाभाऊ कोठारी सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!